Dombivli : बायकोवरचा राग पोलिसांवर काढला, तळीराम पतीला पोलिसांनी जेलमध्ये धाडला

बायको सोबत झालेल्या भांडणाचा (Husband Wife Dispute) राग एका महाभागाने पोलिसांवर काढला .घरात बायकोसोबत भांडण झाले की हा महाभाग दारूच्या नशेत वेगवेगळ्या नंबर वरून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करत पोलीस कर्मचाऱ्याना शिवीगाळ करायचा .

Dombivli : बायकोवरचा राग पोलिसांवर काढला, तळीराम पतीला पोलिसांनी जेलमध्ये धाडला
पोलिसांना फोन करणाऱ्या नवऱ्याला अटक
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 10:30 PM

डोंबिवली : दारूच्या नशेत (Alcoholism) अनेक भयानक प्रकार झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहे. आता डोंबिवलीत एक भलताच प्रकार घडलाय. बायको सोबत झालेल्या भांडणाचा (Husband Wife Dispute) राग एका महाभागाने पोलिसांवर काढला .घरात बायकोसोबत भांडण झाले की हा महाभाग दारूच्या नशेत वेगवेगळ्या नंबर वरून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करत पोलीस कर्मचाऱ्याना शिवीगाळ करायचा .वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नंबर जस्ट डायलवर शोधून त्यांना देखिल शिवीगाळ केली .सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष केलं. मात्र सातत्याने फोन येत असल्याने अखेर या महाभागाला शोधून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना देखील त्याने धकबुक्की केली. हेमंत कंसारा असं या महाभागाचं नाव असून त्याला डोंबिवली देसलेपाडा येथून अटक करण्यात आली आहे .

बायकोशी भांडण, राग काढला पोलिसांवर

डोंबिवली देसले पाडा परिसरात हेमंत कंसारा हा आपल्या पत्नी सोबत राहत होता .हेमंतला दारुचे व्यसन असल्याने हेमंतचे घरी पत्नी सोबत भांडण होत होते. यांचं भांडणाचा राग हेमंत दारूच्या नशेत पोलीसावर काढायचा. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायचा. हेमंत ने दारूच्या नशेत जस्ट डायल वरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही त्यांच्या मोबाईल वर फोन करून त्यांना देखील शिवीगाळ केली. आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना देखील त्याने धकबुक्की केली.

पोलिसांना शिव्या देणे महागात

दारूच्या नशेत लोक अनेक विपरीत प्रकार करतात, त्यातलाच हाही प्रकार आहे. मात्र पोलिसांना अशी शिवीगाळ करणे या महाभागाला चांगलेच महागात पडले आहे. कारण आता त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. घरगुती भांडणं हा अनेकांच्या दैनंदीन जीवनाचा भाग आहे. मात्र अशी भांडणं कधी कधी पोलीस स्टेशनपर्यंत जातात. अशाच भांडनातून कौटुंबिक हिसाही घडतात. मात्र पोलिसांना घरच्या भांडणाचा राग मनात धरून शिव्या देण्याचा हा भलताच प्रकार क्वचितच घडला असेल. या प्रकरानंतर पोलिसानाही चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. हे प्रकरण कुठपर्यंत जातंय. हे आता पूर्ण कारवाईनंतच कळेल.

Labor Society : दरेकरांसारखेच मजूर प्रकरण यवतमाळमध्येही? करोडपती “मजुरा”विरोधात तक्रार

हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या तरुणाचा मृत्यू! ट्रान्सप्लांट केल्यानंतर अवघ्या 3 दिवसात जीव गमावला

GST : 2215 कोटींची बोगस बिलं बनवणाऱ्या सूत्रधारास अटक, कशी केली फसवणूक?