AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जीवाचं काही बरं वाईट करू नकोस यार, बिट्टीची काळजी घे..’, आधी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 24 तासांनी उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे २३ वर्षीय प्रियांकाने लग्नाच्या वाढदिवसानंतर आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने पतीला दीड महिन्याच्या मुलीची काळजी घेण्याची विनंती केली. पालकांनी हुंडाबळीचा आरोप केला आहे, तर मानसिक आजारामुळे पत्नीने हे पाऊल उचलल्याचं पतीने म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, ज्यात सुसाईड नोट आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

‘जीवाचं काही बरं वाईट करू नकोस यार, बिट्टीची काळजी घे..’, आधी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 24 तासांनी उचललं टोकाचं पाऊल
विवाहीत महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
| Updated on: Mar 11, 2026 | 8:26 AM
Share

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक हादरवणारी घटना घडली आहे. तिथे एका 23 वर्षांच्या विवाहीत महिलेने लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मात्र मृत्यूपूर्वी तिने एक इमोशल सुसाईड नोट लिहील होती. ज्यामध्ये तिने तिचया पतीला, त्यांच्या छोट्याशी ( दीड महिने) लेकीची काळजी घेण्याची विनंती केली. या घटनेने सगळेच हादले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका असं मृत महिलेचं नाव असून, अवघ्या वर्षभरापूर्वीच तिचं अजमतपुर मध्ये राहणाऱ्या विशालशी लग्न झालं होतं. त्यांना अव्घाय दीज महिन्याची छोटी मुगी देखील आहे. शनिवारी, या जोडप्याने त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मात्र रविवारी दुपारी, घरातील सगळे पुरुष कामावर गेले होते, तर घरातील महिला या शेळ्या चारायला घेऊन गेल्या असतानाच, प्रियांकाने तिच्या खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तिची वहिनी घरी परतली आणि तिला प्रियांकाची दीड महिन्याची मुलगी रडताना दिसली, तेव्हा तिने आत पाहिल्यावरती हादरली, समोर प्रियांकाचा मृतदेह लटकलेला आढळला.

आनंदात राहा.. ओके बाय

या घटनेने सगळ्यांना धक्का बसला, सर्वांवर दु:खाचा डोंगरच कोसळला, शेजारी-पाजारीही जमले. कोणीतरी पोलिसांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तेथून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली, ती वाचल्यावर सर्वांचे डोळे पाणावले. मृत्यूपूर्वी प्रियांकाने ही चिठ्ठी लिहीली होती. “माझ्या प्रिय मुलीची काळजी घे. मला काहीही समजलं, नाही, पण तू काही ( जीवाचं बरवाईट) करू नकोस, नाहीतर आपल्या मुलीची काळजी कोण घेईल? आनंदाने जग, यार. ओके बाय.” असं तिने लिहीलं होते. या चिठ्ठीच्या शेवटी “बाबूजी” असेही लिहीलं होतं, ते कोणासाठी, नेमकं कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत.

हत्या की आत्महत्या ?

प्रियांकाच्या मृत्यूनंतर, तिचे आई-वडील आणि सासरच्या लोकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. मृत महिलेची आई गीता हिने असा आरोप लावला की, हुंड्याच बाईक आणि सोन्याच्या चेनची मागणी करत जावई विशालने आमच्या मुलीला त्रास दिला होता. आणि त्यानेच तिची हत्या केली. मात्र , पत्नी प्रियांका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि या तणावाखाली त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा तिचा पती विशालने केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे आणि हस्तलेखन तिचंच आहे का हे पडताळून पाहण्यासाठी त्याची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच हे आत्महत्येचे प्रकरण आहे की सखोल कट आहे हे स्पष्ट होईल असं अत्रौली पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश चंद्र यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच