
‘जर शारीरिक संबंध ठेवलेच नाहीत, तर प्रेग्नेंट कशी राहिलीस?’ विवाहबाह्य संबंधांच्या संशायमुळे 6 महिन्यांच्या लव्ह मॅरेजचा भयानक अंत झाला आहे. प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीने अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या केली. नंतर त्याने तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्या व्यक्तीने असा दावा केला की, त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नसतानाही त्याची पत्नी गर्भवती कशी झाली?
22 वर्षीय संगीता निषाद हिची लग्नच्या 6 महिन्यांपूर्वी संजू निषाद याच्यासोबत ओळख झाली होती. संजू हा वयाने संगीता हिच्यापेक्षा एक वर्ष लहान होता. लग्नानंतर दोघांमधील वाद वाढू लागले आणि 18 ऑगस्ट रोजी अखेर नको तेच घडलं… संजू याचं म्हणणं होतं की, संगीताच्या गर्भात वाढणारं मुल त्याचं नव्हतं…
मिळालेल्या माहितीनुसार, संजू आणि संगीता यांची प्रेम कहाणी गेल्या वर्षी सुरु झाली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि लग्नाआधी संगीता प्रेग्नेंट राहिली… अखेर दोघांनीही परस्पर संमतीने औषधांद्वारे गर्भपात केला. 2024 च्या अखेरीस दोघांचं लग्न झालं. संगीताला आशा होती की लग्नानंतर दोघेही त्यांच्या मुलाचं दुःख विसरून एक नवीन सुरुवात करू शकतील. पण घडलं अगदी उलट.
लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संजू आणि संगीता यांच्यामध्ये सर्वकाही ठिक होतं. पण त्यानंतर दुरावा वाढत गेला… याच दरम्यान संगीता पुन्ही प्रेग्नेंट राहिली… पण संजू याच्या चेहऱ्यावर वडील होण्याचा आनंद नव्हता. हे मुल स्वीकारण्यास त्याने नकार दिला. तो संगीतावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करू लागला. संजूने असाही दावा केला की त्याचे संगीतासोबत कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण वाढू लागले.
दोघांमधील वाद टोकाला गेली. अखेर संजू यांने संगीताच्या मानेवर धारदार चाकून वार केला. यामध्ये तिचा मृत्यू झालं. अशा परिस्थितीत घाबरलेल्या संजूने पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. त्यानंतर काही झालंच नाही… असं तो राहू लागला…
अखेर दोन दिवसांनंतर संगीता हिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर संगीता हिचा मृतदेह पोलिसांना नदीच्या किनारी आढळला… चाकू हल्ल्यामुळे पोलिसांना संजूवर संशय आला आणि चौकशीदरम्यान त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला.