AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफेर पडलं महागात! महिलेने असं काय केलं ज्यानंतर व्यापाऱ्याने रूम बुक करत स्वत:ला संपवलं, धक्कादायक घटना

लग्नानंतर पतीचे किंवा पत्नीचे बाहेर कोणासोबत संबंध असल्याच्या अनेक घटना आता समोर येतान दिसत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका व्यापाऱ्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

अफेर पडलं महागात! महिलेने असं काय केलं ज्यानंतर व्यापाऱ्याने रूम बुक करत स्वत:ला संपवलं, धक्कादायक घटना
Extramarital affair
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 16, 2024 | 11:02 PM
Share

एक अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर लोक हैराण झाले आहेत. एका व्यापाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडत आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्येनंतर त्या व्यापाऱ्याने एक नोट देखील लिहून ठेवलीये, आपण आत्महत्या का करत आहोत हे व्यापाराने लिहिलं आहे. आता या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. एका महिनेले आपल्याला ब्लॅकमेल करत आपल्याकडून 9 लाख घेतले आणि इतकंच नाहीतर त्यानंतरही जेलमध्ये पाठवले असल्याचे त्या व्यापाऱ्याने नोटमध्ये लिहिलं आहे.

लखीमपूर मंगलगंज परिसरात राहणारे व्यापारी मनोज कुमार सोनी वय 34 यांनी हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केली. रविवारी सकाळी मनोज हॉटेलमध्ये गेले आणि परत सायंकाळी वापस आले. डीसीपी अभिजीत यांनी सांगितले की, मनोज कुमार सोनी यांनी 15 जुलैला रूम बुक केली. त्यानंतर 11 वाजता कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती सैरपुर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर दरवाजा हा तोडण्यात आला तर रूममध्ये मनोज यांचा मृतदेह मिळाला. यासोबतच पिस्तूल देखील बाजुलाच पडला होता. डीसीपी अभिजीत म्हणाले की, मृतदेहाच्या बाजूला एक नोट देखील मिळाली. ज्यामध्ये एका महिलेच्या नावाचा उल्लेख हा करण्यात आलाय.

त्या नोटमध्ये लिहिण्यात आले की, एका महिलेसोबत मैत्री झाली आणि तिने मला खोट्या केसमध्ये फसवले. नऊ लाख रूपये देऊनही ती सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहे. काही दिवस जेलमध्येही गेलो. मंगलगंजमधील दुकान बंद करावे लागले. परिवारापासून दूर झालो, जामीन मिळाल्यावर बाहेर आलो आणि सीतापूर परिसरात परत दुकान सुरू केले होते.

दुकान सुरू केल्याचे समजल्यापासून ती महिला परत ब्लॅकमेल करत आहे. आता माझ्याकडे काहीच पर्याय उरला नाहीये, असेही मनोज याने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे. संबंधित महिलेवर कारवाई करून आपल्याला न्याय द्यावा असेही त्या नोटमध्ये म्हणण्यात आले. आता पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी