AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

extra marital affairs : आर्मी ऑफिसरच्या पत्नीने तरूणाला घरी बोलावलं, त्यानंतर…. जे झालं त्याने सर्वांनाच बसला धक्का

एका आर्मी ऑफिसरच्या पत्नीचे तरूणासोबत अनैतिक संबंध असतात. संबंधित तरूणाला घरी बोलावल्यावर जे काही घडतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

extra marital affairs : आर्मी ऑफिसरच्या पत्नीने तरूणाला घरी बोलावलं, त्यानंतर.... जे झालं त्याने सर्वांनाच बसला धक्का
| Updated on: Feb 25, 2023 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली : लग्नानंतरही काहींचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र ज्यावेळी विवाहबाह्य संबंध समोर येतात म्हणजे त्यांच्या पार्टनरला याबाबत माहिती होते. त्यावेळी अनेक संसार मोडलेले पाहिले असतील. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका आर्मी ऑफिसरच्या पत्नीचे तरूणासोबत अनैतिक संबंध असतात. संबंधित तरूणाला घरी बोलावल्यावर जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आर्मी ऑफिसरच्या पत्नीची आणि तनवीर आलम या तरूणाची एका सिंगिंग अॅपवर ओळख होते. ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं. अनेकवेळा दोघेही फोनवर अश्लील भाषेत बोलायचे, आर्मी ऑफिसर एका कोर्सनिमित्त महाराष्ट्रात जातो, त्यावेळी पत्नी त्या तरूणाला घरी बोलावून घेतो.

आरोपी तन्वीर आलम घरी आल्यावर ऑफिसच्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेमध्ये त्यांच्या मुलीला दिसतो. हे आरोपीच्या लक्षात आल्यावर त्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला. इतकंच नाहीतर 11 वर्षांचा मुलासोबतही चुकीचं कृत्य केलं.

जेव्हा आर्मी ऑफिसर घरी येतो त्यावेळी पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असते. तिचे वडील विश्वासात घेत काय झालं ते विचारतात तेव्हा सर्व सत्य समोर येते. त्यानंतर संबंधित आर्मी ऑफिसर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात. ही घटना डेहराडूनमध्ये कँट परिसरातील आहे. डेहराडून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, आताच्या डीजीटल युगामध्ये सध्या सर्व काही वेगवान झालं आहे. डेटिंग अॅपमुळे दिसून आलं आहे की, लग्न झालेल्या महिला आणि पुरूषांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. मात्र याचा परिणाम थेट कुटुंबावर होताना दिसत आहे. आता याच प्रकरणावरून पाहिलं तर दोन मुलं असतानाही आर्मी ऑफिसरच्या पत्नीचं बाहेरील तरूणासोबत अफेर होते. मात्र हे प्रकरण अंगलट आलं आहे. अल्पवयीन मुलीने डेअरिंग केली नसती तर कदाचित हे प्रकरण उघडकीस आलं नसतं.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.