AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा…

डाटा लीकच्या वाढत्या प्रमाणाने फेसबुक युजर्सच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल दहा लाखांहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

फेसबुक युजर्सना धोक्याचा इशारा, आजच आपला पासवर्ड बदला अन्यथा...
फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्याImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 07, 2022 | 11:26 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्वांकडेच अँड्रॉइड फोन आहेत. स्मार्टफोन हाती असल्यामुळे स्वाभाविकच व्हॉट्स अॅप, फेसबुक ट्विटर यांसारखी समाजमाध्यमेही मोठ्या प्रमाणावर हाताळली जात आहेत. सोशल मीडियाचा हा वाढता वापर एकीकडे माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतोय खरा, पण सध्या फेसबुक युजर्ससाठी (Facebook Users) धोक्याची घंटा वाजली आहे. डाटा लीक (Data leak) होण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे फेसबुक युजर्सनी संभाव्य धोका रोखण्यासाठी तातडीने आपले पासवर्ड बदलण्याची (Change Password) गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एकाच दिवसात 10 लाख युजर्सचा डाटा लीक

डाटा लीकच्या वाढत्या प्रमाणाने फेसबुक युजर्सच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल दहा लाखांहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

लीक झालेला डाटामध्ये फेसबुक अकाउंटच्या पासवर्डचाही समावेश आहे. नजीकच्या काळात हा धोका आणखी वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सनी आपले पासवर्ड लगेच बदलावेत, असे आवाहन सोशल मीडियातील जाणकारांनी केले आहे.

थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून डाटा लीक

फेसबुकवरील डाटा चोरीचा प्रकाराबाबत मीठ आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून डाटा लीक झाल्याचे मेटाने म्हटले आहे. मेटाने आतापर्यंत 400 हून अधिक ॲप्सची ओळख पटवली आहे.

मेटाचे वरिष्ठ अधिकारी डेविड एग्रानोविच यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. अॅप्पल आणि अँड्रॉइड फोनसाठी बनवलेल्या विशिष्ट अॅप्सच्या माध्यमातून डाटा चोरीचे धाडस दाखवले जात आहे.

संबंधित ॲप्स अॅप्पल आणि गुगल अॅप स्टोअरवर सहजासहजी उपलब्ध होत आहेत.

मार्क झुकेरबर्ग यांना बसलाय 5 अब्ज डॉलर्सचा फटका

डाटा चोरीचा प्रकारांमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना आतापर्यंत पाच अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. 2018 मध्ये कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डाटा लीक झाला होता. त्या प्रकरणात फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकला पाच अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला होता.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.