नाश्ता बनवायचा म्हणून आईने बापाकडे बाळ दिलं, बापाकडून चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून

हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनी आपल्याच दोन वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा चिरुन हत्या केली. नाश्ता बनवायचा म्हणून आईने बापाकडे बाळ दिलं, पण बापाने त्याचवेळी चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून केला.

नाश्ता बनवायचा म्हणून आईने बापाकडे बाळ दिलं, बापाकडून चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 3:26 PM

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनी आपल्याच दोन वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा चिरुन हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगर हाऊस प्रशांत नगर येथे राहणारा हसीब हा सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. सहा वर्षांपूर्वी हसरत बेगम यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. तिला दोन मुले होती.

बापाकडून चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून

असं सांगितलंय जातंय की, हसीबची मानसिक स्थिती गेल्या तीन वर्षांपासून ठीक नव्हती. त्यामुळे, तो बहुतेक घरातच राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तो रागाने त्याचा मोठा मुलगा इस्माईल (2) याला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. तेथे त्याने आपल्या मुलाचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्या पळून जाण्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.

बाळाचा खून झाला कळताच आई बेशुद्ध

ही घटना ऐकताच त्याची पत्नी हसरत यांची शुद्ध हरपली. तिने ताबडतोब तिच्या रक्ताने माखलेल्या मुलाला रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हसरत बेगम यांनी सांगितल्याप्रमाणे मूल रडत होते. मी त्याच्या वडिलांना मुलाला थोडा वेळ खेळविण्यासाठी दिले जेणेकरून मी त्यांना नाश्ता बनवू शकेन. जे घडले ते स्वप्नातही पाहू शकत नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

एका आठवड्यापूर्वी हैदराबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या सासऱ्याची हत्या केली होती. मियापूरच्या आदित्य नगरमध्ये पती -पत्नीमधील भांडणाने नंतर उग्र रूप धारण केले. या भांडणामुळे संतापलेल्या व्यक्तीने आपल्या सासऱ्याची हत्या केली.

(father kill two year son brutally slit in hydrabad Crime News)

हे ही वाचा :

आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!

जाचाला कंटाळून विवाहितेचा गळफास, माहेरच्यांनी सासरच्या दारातच चिता पेटवली

पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक