पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक

Trupti Kolte | तहसीलदार तृप्ती कोलते यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 16 टी 4100) दिसला. तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला. त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला.

पुण्यात तहसीलदाराला 'गुगल पे'वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक
गुगल पे
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 8:17 AM

पुणे: हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने लाज देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार कोलते यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर गुगल पे च्या माध्यमातून 50 हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर तृप्ती कोलते यांनी खडक पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे दत्तात्रय हिरामण पिंगळे ( वय 33, रा.देऊळगावगाडा, ता. दौंड जिल्हा पुणे) आणि अमित नवनाथ कांदे (वय 29, कमलविहार गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, ता.हवेली जिल्हा पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या खडक पोलीस या प्रकरणाला पुढील तपास करत आहेत.

नेमका काय प्रकार घडला?

तहसीलदार तृप्ती कोलते यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच 16 टी 4100) दिसला. तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला. त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला. यानंतर कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला (Venkatesh Chiramulla) यांना फोन करुन याबाबत माहिती दिली.

तसेच तलाठी किंवा कोतवाल यांना पाठवण्यास सांगितले. कोलते या ट्रकजवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत बसल्या होत्या. त्यावेळी दत्तात्रय पिंगळे हा त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपण गाडीचा मालक असल्याचे सांगत गाडी सोडण्याची विनंती केली. तसेच त्यांना पैशांचे आमिष देऊ लागला. कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन करवाई करणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अमित कांदे याने तृप्ती कोलते यांना फोन केला. परंतु, तृप्ती कोलते यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर गुगल पे वरुन तृप्ती कोलते यांच्या खात्यात प्रथम 1 रुपया आणि नंतर 50000 रुपये जमा झाले. यानंतर तृप्ती कोलते यांनी आपल्याला ऑनलाईन लाच देण्याचा प्रयत्न झाल्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

कोण आहेत तृप्ती कोलते?

तृप्ती कोलते यांनी मे 2021 मध्ये हवेलीच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. कोलते यांनी गेल्यावर्षी पुणे शहरात आलेल्या पुरावेळी उल्लेखनीय कामगिरी केली होती. तत्पूर्वी तृप्ती कोलते यांनी पुणे शहर, मावळ आणि सोलापूर याठिकाणी तहसीलदारपदाची जबाबदारी सांभाळली होती.

संबंधित बातम्या:

पुण्यात कोट्यवधींचा जमीन घोटाळा, नायब तहसीलदाराला अटक

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.