AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीचा राग मुलीवर काढला, क्रूर पित्याने जे केले ते पाहून सर्वच हादरले

कोचा बरनाग गावात पप्पू तुरी आपली पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीसोबत राहतो. पप्पूला दारुचे व्यसन आहे. रोज दारू पिऊन तो पत्नीशी भांडण करत असे.

पत्नीचा राग मुलीवर काढला, क्रूर पित्याने जे केले ते पाहून सर्वच हादरले
पती-पत्नीच्या वादातून मुलीला जाळलेImage Credit source: TV9
| Updated on: Oct 08, 2022 | 3:04 PM
Share

झारखंड : नवरा-बायकोच्या भांडणात अनेकदा मुले नाहक होरपळली जातात, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र झारखंडमध्ये पती-पत्नीच्या वाद (Husband-Wife Dispute) थेट मुलीच्या जीवावरच बेतला असल्याची घटना उघडकीस आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणातून एका चार वर्षाच्या मुलीला पित्याने जिवंत जाळल्याची (Father Burn Daughter Alive) घटना झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यात (Lohardaga District Jharkhand) घडली आहे.

आगीत चिमुकली गंभीर जखमी

या घटनेत पीडित चिमुकली 80 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पप्पू तुरी असे आरोपी पित्याचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

आरोपी दारुच्या नशेत रोज भांडण करायचा

किस्को पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कोचा बरनाग गावात पप्पू तुरी आपली पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीसोबत राहतो. पप्पूला दारुचे व्यसन आहे. रोज दारू पिऊन तो पत्नीशी भांडण करत असे.

शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पप्पू दारु पिऊन घरी आला आणि पत्नीशी भांडण करु लागला. या भांडणातून त्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळून गेली.

पत्नी जीव वाचवून पळाल्याने मुलीला जाळले

पत्नी बाहेर पळाल्यानंतर सनकी पप्पूने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि 4 वर्षाच्या मुलीवर आपला राग काढला. पप्पूने मुलीला पेटवले. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी मुलीची आगीतून सुटका करत तिला सदर रुग्णालयात दाखल केले.

मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला रांची येथील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी किस्को पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

चारित्र्याच्या संशयातून घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड

आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेम संबंध सुरु असल्याच्या संशयातून आरोपी रोज पत्नीशी भांडण करायचा आणि तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न करायचा, अशी प्राथमिक तपासात पुढे आली आहे. मात्र तपासाअंतीच खरे कारण स्पष्ट होईल.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.