Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक, सहा जण फरार

| Updated on: Aug 24, 2023 | 5:37 PM

नाशिक एटीएसला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक एटीसने नगरमध्ये एका ठिकाणी छापा टाकला. या कारवाईनंतर सर्वांच्याच भुवया वर झाल्या आहेत.

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक, सहा जण फरार
नगरमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर / 24 ऑगस्ट 2023 : भारतामध्ये घुसखोरी करून राहत असलेल्या चार बांगलादेशींना नगरमधून ताब्यात घेण्यात आले आहेत. अन्य सहा जण फरार झाले आहेत. अहमदनगरच्या खंडाळा येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून बंगलादेशी लोक ओळख लपवून राहत होते. एजंटला पैसे देऊन बांगलादेशहून भारतात आले होते. नाशिक एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नगर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नाशिक एटीएस आणि नगर तालुका पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे नाशिक एटीएसची कारवाई

खंडाळ येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून काही बांगलादेशी नागरिक ओळख लपवून राहत असल्याची माहिती नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानुसार नाशिक एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या क्रेशरवर छापा टाकला. यावेळी चार बांगलादेशी नागरिक येथे काम करताना आढळून आले. चार जणांकडे चौकशी केली असता बनावट कागदपत्र आणि पासपोर्ट आढळून आले. मोहीनूद्दीन नाजीम शेख, शहाबुद्दीन जहागिर खान, दिलावर खान सीराज ऊल्लह खान, शहापरान जहागिर खान अशी अटक बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

अटक बांगलादेशींकडून कागदपत्र जप्त

आरोपींविरोधात अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471 तसेच भारतामध्ये प्रवेश 3(A) 6(A) 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून बनावट पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, नगरमध्ये बांगलादेशी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे बांगलादेशी नगरमध्ये का आले?, ओळख लपवून का राहत होते? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा