तुम्हीही मुलांना चॉकलेट देत असाल तर सावधान, आधी ही बातमी नक्की वाचा !

| Updated on: May 24, 2023 | 12:58 PM

लहान मुलांना चॉकलेट खूप प्रिय असते. पण हे चॉकलेट मुलांच्या कधी जीवावर बेतू शकते, असा कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हीही मुलांना चॉकलेट देत असाल तर ही बातमी वाचाच.

तुम्हीही मुलांना चॉकलेट देत असाल तर सावधान, आधी ही बातमी नक्की वाचा !
चॉकलेट घशात अडकल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

दिल्ली : सर्व लहान मुलांचे चॉकलेट फेव्हरेट असतात. चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात असं आपण नेहमी लहान मुलांना सांगतो. पण चॉकलेट खाल्ल्याने मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकले आहे का?. होय पण हे खरं आहे. चॉकलेटमुळे एका 4 वर्षाच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. एनसीआरमधील ग्रेटर नोएडा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चॉकलेट खाल्ल्याने एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. मुलगा चॉकलेट खात असताना अचानक त्याच्या घशात ते अडकले. चॉकलेट मुलाच्या श्वासनलिकेत अडकल्याने त्याचा श्वास बंद झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने मुलाला बुलंदशहर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात नेले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

चॉकलेट घशात श्वासनलिकेत अडकले

शांतीनगर येथे राहणारा 4 वर्षांच्या मुलाने सोमवारी रात्री घराजवळील दुकानातून चॉकलेट विकत घेतली आणि खात होता. दरम्यान, चॉकलेट श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे मुलगा गुदमरला. घरच्यांनी त्याच्या घशातून चॉकलेट काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र श्वासनलिकेत चॉकलेट अडकल्याने खूप प्रयत्न करूनही ते बाहेर पडू शकले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला डॉक्टरांकडे नेले. मुलाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीय मुलाला बुलंदशहरला नेले, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चॉकलेट घशात अडकल्याने श्वास घ्यायला त्रास झाला

श्वासनलिकेत चॉकलेट अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. चॉकलेट काढण्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात आले, मात्र वेळ लागत असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुलाला वाचवता आले नाही. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या सांगण्यावरून कुटुंबातील व्यक्तीने त्याला पैसे दिले होते. त्यानंतर मुलगा दुकानातून चॉकलेट घेऊन गेला.

हे सुद्धा वाचा