पैसे मिळवण्यासाठी तिने नाटक केले, पण हेच नाटक अंगाशी आले अन् जे घडले ते भयंकर !

दोन लग्न मोडल्यानंतर महिला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. मग पुढे जे घडले ते भयंकर होते.

पैसे मिळवण्यासाठी तिने नाटक केले, पण हेच नाटक अंगाशी आले अन् जे घडले ते भयंकर !
अनेतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 10:54 AM

गाझियाबाद : हजार रुपये मागितले म्हणून लिव्ह इन पार्टनरने महिलेची हत्या केल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुरवातीला आरोपीने आत्महत्येचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे त्याची पोलखोल झाली. महिलेची आधी दोन लग्न झाली होती. दोन पतीपासून तिला 5 मुलं आहेत. मात्र दोन्ही पतींना सोडून आरोपींसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने महिलेच्या दुसऱ्या पतीशी समझोता केल्यामुळे फिर्याद द्यायला कुणी तयार नव्हते.

महिलेच्या दोन मुलींची लग्न झालं असून, अन्य तीन मुलांसोबत महिला लिव्ह इन पार्टनरसोबत राहत होती. महिला एका साबण कंपनीत कामाला होती, तिथेच तिची भेट आरोपीशी झाली. मग दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. दोघांनाही दारुचे व्यसन होते.

पैशावरुन दोघांचा वाद झाला

गुड्डी आणि आनंद 18 मे रोजी रात्री दोघेही दारु प्यायले होते. यावेळी गुड्डीने आनंदकडे माहेरी जाण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. मात्र आनंदकडे दोन हजार रुपयेच होते. यातील एक हजार रुपये त्याने गुड्डीला दिले. मात्र ती बाकीचे हजार रुपयेही मागत होती. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. यानंतर गुड्डीने आत्महत्येचे नाटक केले. यानंतर संतापलेल्या आनंदने तिची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

आरोपी अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आत्महत्येचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्येचा खुलासा झाला. मग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.