AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोसरी पोलीस स्थानकात किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंना गंडा

यापूर्वीही गोसावीच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये मलेशियात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांकडून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये घेतले होते.

भोसरी पोलीस स्थानकात किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंना गंडा
Bhosari police station
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 12, 2021 | 10:11 AM
Share

पिंपरी – पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधून आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सद्यस्थितीला पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या किरण गोसावीने 2015 मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (33)वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस (Bhosari police station)  स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे. गोसावीने ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष पीडित व्यक्तीला दिले होते. त्यासाठी विजयकुमार कानडे यांच्याकडून 2 लाख 25 हजार इतकी रक्कम घेतल्याची माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. ज्या- ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन भोसरीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले आहे.

विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल यापूर्वीही गोसावीच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये मलेशियात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांकडून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये घेतले होते. या फसवणूक प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गोसावीने मलेशिया, सिंगापूर यासारख्या ठिकाणी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणाची फसवणूक केली आहे. यासाठी त्याने तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

किरण गोसावी कोण आहे? वादग्रस्त व बनावट पंच असलेला किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.

हे ही वाचा

औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू

अखेर साहित्य संमेलन आयोजकांना उपरती; वाढत्या रोषानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?