Crime | जिगोलो बनण्याची हौस पडली महागात, मोठी फसवणूक होताच तरुणाची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं ?

जिगोलो म्हणजेच पुरुष वेश्यावृत्तीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. जिगोलो (Jigolo) बणण्याची हौस असणाऱ्या एका तरुणाला तब्बल दीड लाख रुपयांचा चुना लागला आहे. फसवणूक झाल्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली आहे.

Crime | जिगोलो बनण्याची हौस पडली महागात, मोठी फसवणूक होताच तरुणाची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं ?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 9:17 AM

नोएडा : महिलांना त्यांच्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसायात (Prostitution) ढकलण्याचे प्रमाण बरेच आहे. या व्यवसायासाठी महिलांची विक्रीसुद्धा होते. तसे अनेक प्रकरणं उघडकीस आले आहेत. सध्या मात्र जिगोलो म्हणजेच पुरुष वेश्यावृत्तीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. जिगोलो (Gigolo) बणण्याची हौस असणाऱ्या एका तरुणाला तब्बल दीड लाख रुपयांचा चुना लागला आहे. फसवणूक झाल्यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली असून हा प्रकार नोएडा (Noida) येथील सेक्टर 49 मधील आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार सेक्टर 49 येथील एका युवकाला जिगोलो म्हणजे पुरुष वेश्यावृत्ती करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने एका ठिकाणी रजिस्ट्रेशन केले. तसेच सांगितल्याप्रमाणे त्याने 1 लाख 54 हजार 430 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पैसे भरण्याआधी त्याला पुरुष वेश्यावृत्ती केल्यानंतर भरगोस पैसे मिळतील तसेच रोज नवनव्या मुलींची भेटही होईल, असे प्रलोभन देण्यात आले. याच प्रलोभनाला बळी पडून तरुणाने तब्बल दीड लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले. मात्र नंतर आपल्यासोबत धोका झाल्याचे या तरुणाला समजले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. फसवणूक झालेल्या तरुणाने लगेच सेक्टर 49 परिसरातील पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलीस सध्या तपास करत आहेत. मात्र ही अजब फसवणूक समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

भरगोस पेैसे, नवनव्या मुलींसोबत मैत्रीचे प्रलोभन 

दरम्यान, जिगोलो बणण्याचे प्रलोभन देताना भरगोस पैसे मिळतात आणि रोज नव्या मुलींची भेट होते अशा प्रकारचे प्रलोभन देण्यात येते. याला बळी पडून अनेक तरुण लाखो रुपये गमावून बसतात. याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. मुळात पैसे भरल्यानंतर जिगोलो बणण्यासाठी मदत करणारी कोणतीही संस्था नाही, असे समोर येते. तसाच प्रकार या तरुणासोबत झाला आहे. काही प्रकरणांत जिगोलो बणण्याचे प्रलोभन देत तरुणांचे खासगी फोटो मिळवले जातात. तसेच त्यांना ब्लॅकमेल केले जाते. नोएडा पोलीस तरुणासोबत झालेल्या फसवेगिरीचा तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक

Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे… सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत

Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार