आश्रमात वेब सीरीज सारखं कांड! साध्वीवर बलात्कार, सगळेच हादरले
या ताज्या घटनेनंतर आश्रमात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. लोक विचार करायला मजबूर झालेत, या आश्रमात अशा गोष्टी चालत असतील, तर शांतता कुठे मिळणार?.

गुरुकुल शांतीधाम आश्रमात एका साध्वीसोबत बलात्काराच प्रकरण घडलय. गुरुकुल शांतिधाममधील या बलात्कार प्रकरणामुळे जिल्ह्यातील शांतता भंग झाली आहे. बातमी मिळताच तात्काळ Action मध्ये आलेल्या पोलिसांनी आश्रमाच्या संचालिका 60 वर्षीय दिव्य योग माया सरस्वती आणि त्यांची सहाय्यक शबनम यांना अटक केली आहे. अजूनही बलात्कार करणारा आरोपी फरार आहे. गोकुळ असं आरोपीच नाव आहे. गाजियाबादमधील कौशांबी पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे.
आश्रमाच्या संचालिका आणि त्यांच्या सहाय्यक महिलेने पीडित साध्वीला नशेचा पदार्थ मिसळलेलं कोल्ड ड्रिंक प्यायला लावलं. साध्वी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायला लावला. गोकुळने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडितेनुसार, शुद्ध आल्यानंतर तिने विरोध सुरु केला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी मिळून तिला मारहाण केली. सोबतच तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
सध्या तो अंडरग्राऊंड
या घटनेनंतर आरोपी गोकुळ आश्रमातून फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आश्रमाच्या संचालिकेची कसून चौकशी सुरु आहे. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलाय. गाजियाबाद पोलीस कमिश्नरेट डीसीपी ट्रांस हिंडन निमिष पाटील यांच्यानुसार गोकुळच्या अटकेसाठी वेगाने शोध मोहिम सुरु आहे. तो लपण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी छापेमारी सुरु आहे. सध्या तो अंडरग्राऊंड झालाय.
तर शांतता कुठे मिळणार?
पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर रिपोर्ट नोंदवून तपास सुरु केला आहे. दिल्ली बॉर्डरला लागून असलेल्या कौशांबी येथे गुरुकुल शांतिधाममध्ये योग संयमित जीवनाचा पाठ शिकवला जातो. मोठ्या संख्येने लोक इथे योगाभ्यास आणि शिकण्यासाठी येतात. या ताज्या घटनेनंतर आश्रमात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. लोक विचार करायला मजबूर झालेत, या आश्रमात अशा गोष्टी चालत असतील, तर शांतता कुठे मिळणार?.
