इश्क का रंग ‘लाल’, प्रेम विवाहाने संतप्त वधूपक्षाकडून वराची हत्या; सुनेच्या आईचा जीव घेत सासरच्यांकडून सूड

जामनगरमधील हापा योगेश्वर धाम परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय सोमराजचा त्याच ठिकाणी राहणाऱ्या रुपलखासोबत प्रेम विवाह झाला होता. मुलगा चारण समाजाचा होता, तर मुलगी क्षत्रिय समाजाची. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे आनंदी नव्हती

इश्क का रंग 'लाल', प्रेम विवाहाने संतप्त वधूपक्षाकडून वराची हत्या; सुनेच्या आईचा जीव घेत सासरच्यांकडून सूड
उल्हासनगरमध्ये मारहणीत एकाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:41 PM

गांधीनगर : गुजरातमधील जामनगरमध्ये ऑनर किलिंगच्या (Honor Killing) नावाखाली दुहेरी हत्याकांडाच्या (Double Murder) घटनेने खळबळ उडाली आहे. आंतरजातीय विवाहाचा (Inter Caste Marriage) राग आल्यामुळे वधूपक्षाने तरुणाची हत्या केली. यानंतर काही वेळातच मुलाच्या घरच्यांनी सुनेच्या आईची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

जामनगरमधील हापा योगेश्वर धाम परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय सोमराजचा त्याच ठिकाणी राहणाऱ्या रुपलखासोबत प्रेम विवाह झाला होता. मुलगा चारण समाजाचा होता, तर मुलगी क्षत्रिय समाजाची. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे आनंदी नव्हती. मुलीच्या कुटुंबीयांना एवढा राग आला की त्यांनी त्या तरुणाचा खून करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याची शोधाशोध सुरु केली.

हे सुद्धा वाचा

नवरदेवाचा खून

दरम्यान, राजकोट रोडवरील अतुल शोरूमजवळ सोमराज उभा असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. लगेच ते तिथे पोहोचले. पत्नीच्या घरच्यांना पाहताच सोमराज जवळच्या शोरूममध्ये घुसला. मात्र सूड घेण्याच्या उद्देशाने आलेल्या सशस्त्र वधूपक्षाने शोरूममध्ये घुसून तरुणाची हत्या केली.

वधूमायेची हत्या

त्यामुळे संतप्त झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनीही मुलीच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यावेळी मुलीची आई अनिता बाला घरात होती, त्यामुळे बदला घेण्यासाठी त्यांनी वधूमायेची हत्या केली.

सुडाच्या आगीतून दोन जीव गेले

जामनगरचे एसपी प्रेमसुख डेलु यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांचा मुख्य आधार प्रेम प्रकरण आहे. या लग्नामुळे त्यांच्या कुटुंबीयांची नाराजी होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.