Gunratna Sadavarte: एकीकडे उसासा, दुसरीकडे दिलासा! सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंना जामीन मंजूर

| Updated on: Apr 20, 2022 | 3:36 PM

सातारा पोलिसात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gunratna Sadavarte: एकीकडे उसासा, दुसरीकडे दिलासा! सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंना जामीन मंजूर
गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunranta Sadavarte Latest News) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं (Satara district session court) हा जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील गिरगाव कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बचाव पक्षाचे वकील श्याम प्रसाद बेगमपुरे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सातारा पोलिसात (Satara Police) गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता सातारा सत्र न्यायालयानं दिलेल्या दिलासा आणि दुसरीकडे गिरगाव कोर्टानं दिलेला दणका, अशा दोन्ही बातम्यांमुळे गुणरत्न सदावर्ते हे चर्चेत आले आहेत. एकीकडे शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गिरगाव कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं फटकारलंय.

गुणरत्न सदावर्ते यांना फटकारल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यानंतर आता सातारा सत्र न्यायालयानं गिरगाव कोर्टानं दिलेल्या निकालानंतर साताऱ्यातील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सातारा कोर्टानं निकाल देत गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा दिला आहे.

साताऱ्यात काय झालं होतं?

सातारा पोलिसात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणावरुन केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारनं सातारा पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता.

त्यानंतर सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुंबई पोलिसांना सदावर्तेंना ताब्यात घेण्यामागचं प्रकरण होतं शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला. आता याप्रकरणी सदावर्ते यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नव्हता. त्यानंतर सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, आता सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही इतके मुंबईतील गिरगाव कोर्टात युक्तिवाद सुरुच होता. या युक्तिदावादादरम्यान गिरगाव कोर्टानं बुधवारी गुणरत्न सदावर्ते यांना फटकारलं. त्यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली.

न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडीत फरक काय?

  1. पोलीस कोठडी म्हणजे संशयिताचा पूर्ण ताबा पोलिसांकडे असतो
  2. आरोप पळून जाण्याचा संशय असेल, तर पोलीस कोठडी सुनावली जाते
  3. न्यायलयीन कोठडी ही तपासादरम्यानच्या चौकशीसाठी सुनावली जाते
  4. न्यायालयीन कोठडीत ताबा पूर्णपणे पोलिसांकडे नसतो
  5. न्यायालयीन कोठडी पोलिसांच्या ताब्यात नसते
  6. सीबीआय कोठडी, ईडी कोठडी आणि आर्थिक गुन्हे शाखेची कोठडी वेगवेगळी असते
  7. या कोठडींचा पोलीस आणि न्यायालयीन कोठडीशी संबंध नसतो.
  8. सीबीआय, ईडी आणि इतर कोठडींमध्ये संबंधित कार्यालयात चौकशीसाठी संशयिताला ठेवलं जातं