AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे कमवण्याचा मोह नडला, सोन्याची बिस्किटे गेली; जीम ट्रेनरची फसवणूक

पैसा.. सगळ्यांनाच हवा असतो. कष्ट करून, काम करून बहुतांश लोक पैसे कमावतात. घा गाळून मिळवलेला पसै सर्वांना प्रिय असतो, पण काहीजण मोहात पडून, स्वस्तात, सोप्या मार्गाने झटपट पैसा कमावण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र काहीवेळा झटपट पैसे कमावण्याचा हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि मेहनतीच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली.

पैसे कमवण्याचा मोह नडला, सोन्याची बिस्किटे गेली; जीम ट्रेनरची फसवणूक
| Updated on: Aug 05, 2024 | 11:46 AM
Share

पैसा.. सगळ्यांनाच हवा असतो. कष्ट करून, काम करून बहुतांश लोक पैसे कमावतात. घाम गाळून मिळवलेला पसै सर्वांना प्रिय असतो, पण काहीजण मोहात पडून, स्वस्तात, सोप्या मार्गाने झटपट पैसा कमावण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र काहीवेळा झटपट पैसे कमावण्याचा हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि मेहनतीच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. स्वस्तात सोन्यातून पैसै कमावण्याचा मोह एका जिम ट्रेनरला चांगलाच महागात पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित इसम हा विक्रोळीतील रहिवासी असून तो एक जिम ट्रेनर आहे. स्वस्तात पैसे कमावण्याचा मोह त्याला नडला आणि आयुष्यभराची कमाई त्याने एका झटक्यात गमावली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अशी झाली फसवणूक

पीडित जीम ट्रेनरची दुसऱ्या इसमाशी ओळख झाली. सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट सहा लाखांत देतो, असे सांगून त्याला फसवण्यात आले. विशेष म्हणजे, ही फसवणूक करताना, पोलिसांचा छापा पडल्याचे भासवण्यात आले. मात्र आपण तोतयांच्या सापळ्यात अडकलो असून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या ट्रेनरने अखेर पोलिसांत धाव घेतली.

व्यायामशाळेत प्रशिक्षण देणाऱ्या विक्रोळी येथील समीर (बदललेले नाव) याच्या मित्रांनी त्याला अनूप आणि हेमंत अग्रवाल नावाच्या व्यक्तींबाबत सांगितले. हे दोघे बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट बाजारात सात लाखांपेक्षा अधिक दरात मिळते, मात्र तेच बिस्कीट हेमंत सहा लाखांत देत असल्याचे समीर याला सांगण्यात आले होते.

तसेच या सोन्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत की नाही, याची खात्री करून द्यावी लागत असल्याची माहिती समीरच्या मित्रांनी त्याला दिली. सहा लाखांत बिस्कीट घेऊन ते बाजारात सात लाखांना विकल्यास एक लाख रुपये फायदा होईल, असा विचार करून समीर याने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे त्याने खरेदी केली. मात्र नंतर फसवणूक झाली आणि त्याने सोन्याची बिस्कीटंही गमावली. अखेर पीडित इसमाने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत .

Follow Us
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी