
हरियाणातील पानिपत आणि सोनीपत येथे चार निष्पाप मुलांच्या झालेल्या हत्येने संपूर्ण राज्य नव्हे तर देशच हादरून गेला. त्या मुलांचा मृत्यू म्हणजे अपघात होता असं इतकी वर्षं लोकांना वाटत होतं, पण तो तर एक क्रूर आणि पूर्वनियोजित खून होता हे समोर आल्यावर सगळेच हबकले. एकाच महिलेने या चार जणांची हत्या केली, आणि त्याचं कारण ऐकून तर तुम्ही सुन्न व्हाल. ती मुलं सुंदर होती, फक्त याच कारणामुळे त्य महिलेने निष्पाप मुलांचा बळी घेतला. खरंतर त्या महिलेला फक्त मुलींचा द्वेष होता, पण तिने स्वतःच्या मुलालाही मारले. हे ऐकूनच विचित्र वाटतंय, कारण फक्त मुलींना लक्ष्य करत असतानाच तिने तिच्या पोटच्या मुलाचाही जीव घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामागचं कारण ऐकून अनेकांना धडकी भरली.
ही कहाणी आहे 32 वर्षीय पूनमची, ती एक सायको किलर आहे. जेव्हा पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिला तिच्या या क्रूर कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झाला नाही. पानिपत पोलिसांच्या सांगण्यानुसार, पूनमने चौकशीदरम्यान कबूल केले की तिला सुंदर मुलांचा, विशेषतः मुलींचा हेवा वाटायचा. धक्कादायक म्हणजे, तिने मारलेल्या चार मुलांपैकी तीन मुली होत्या आणि एक तर तिचा स्वतःचाच मुलगा होता.
म्हणून पाण्यात बुडवून मारायची
पोलिसांनी तिची चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं. घरात इतर कोणालाही शंका येऊ नये म्हणून आपल्यात पोटच्या मुलाला मारून टाकल्याचं तिने सांगितलं. त्या मुलांना पाण्यातच बुडवून का मारायची तेही तिने सांगितलं.पाण्यात बुडवल्यावर, मुलं आता श्वास घेत हे दिसल्यावर ती आता मेलीत हे तिला निश्चित कळायचं, म्हणून ती या मार्गाचा अवलंब करायची. मात्र, सोनीपतमधील पूनमच्या सासरच्या लोकांनी वेगळीच कहाणी सांगितली. ते म्हणाले, सांगितले की पूनम अनेकदा म्हणायची की तिच्या आत एका तरुणाचा आत्मा आहे. “मी तीन मुलांना मारलं” असं ती तिचा आवाज बदलून म्हणायची. दरम्यान, तपासात आणखी एक आश्चर्यकारक दृष्टिकोन समोर आला आहे, तो म्हणजे असा की, पूनम उत्तर प्रदेशातील कैराना येथील एका तांत्रिकाच्या संपर्कात होती.
चार हत्यांची भयानक कहाणी
पहिले दोन खून 2023 सली झाले. पूनमने तिच्या मुलाला आणि तिच्या नणंदेच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले. पानिपतचे पोलिस अधीक्षक भूपेंद्र सिंह यांच्या सांगण्यानुसार, पूनमने 2023 साली मध्ये भावड येथील तिच्या सासरच्या घरी दोन निष्पाप मुलांची हत्या केली. त्यापैकी एक हा पूनमचा स्वतःचा मुलगा शुभम होता, जो फक्त तीन वर्षांचा होता. तर दुसरी मुलगी ही नणंदेची अवघ्या 9 वर्षांची मुलगी होती. त्या दोघांनाही पूनमने घरातल्या पाण्याच्या टँकमध्ये बुडवून मारलं. घरात कोणालाही शंका येऊ नये म्हणून नणंदेच्या मुलीसह मी माझ्या मुलालाही मारून टाकलं, असं तिने पोलिसांना सांगितलं. त्यावेळी घरात खरंच कोणलााही पूनमवर संशय आला नाही. तो अपघाती मृत्यू असल्याचं सगळ्यांनी मानलं.
त्यानंतर, ऑगस्ट 2025 मध्ये, तिने तिसरा खून केला. यावेळी, पूनमचे लक्ष्य 6 वर्षांची जिया होती. ऑगस्ट 2025 मध्ये, पूनम ही सिवाह गावात तिच्या माहेरी होती. तिथे तिने तिच्या चुलत भावाची6 वर्षांची मुलगी जिया हिला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले. तिचा मृत्यू झाला. हाही अपघात मानून कुटुंबियांनी लहान मुलीचे अंत्यसंस्कार केले. यावेळी काहींना पूनमवर संशय आला खरा, पण कोणी खोलात न गेल्याने प्रकरण तिथेच मिटलं.
त्यानतंर 1 डिसेंबरला पूनमने चौथी हत्या केली, मात्र यावेळी तिचं नशीब तिच्या पाठीशी नव्हतं आणि अखेर ती पकडली गेली. 1 डिसेंबर रोजी नौलठा गावात नातेवाईकांचं लग्न होतं. सर्वजण लग्नाच्या वरातीत बिझी होते. तेवढ्यात पूनमची नजर 6 वर्षांच्या विधीवर पडली. सर्वांची नजर चुकवून पूनम ही विधीच्या पाठीमागे गेली. नंतर तिने टेरेसवरील प्लास्टिकच्या टबमध्ये बुडवून विधीची हत्या केली. तिने बाहेरून दरवाजा बंद केला आणि खाली येऊन ओल्या कपड्यांबद्दल वेगवेगळी कारणं देत राहिली.
कशी पकडली गेली सायको किलर ?
त्या मुलीच्या घरात लग्नाचे विधि सुरू होते. शगुन देण्यासाठी आजीने विधीला बोलावलं, हाक मारली. पण बऱ्याच हाका मारूनही विधि आली नाही, मग आजीने तिचा शोध सुरू केला. संपूर्ण कुटुंब घाबरले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर, विधीचा मृतदेह लग्नघराच्या पहिल्या मजल्यावर एका बंद स्टोअररूममध्ये आढळला. तिचे डोके पाण्याच्या टबमध्ये बुडवले होते आणि तिचे पाय जमिनीवर होते. एफएसएल टीम आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. “हा टब बाथरूममध्ये होता, मग तो स्टोअररूममध्ये कसा आला?” असा प्रश्न कुटुंबातील एका सदस्याने उपस्थित केला, तेव्हाच पहिला क्लू मिळाला.
त्यानंतर पोलिसांनी सर्वांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली. तेव्हाही पूनमने न घाबरता, अगदी आत्मविश्वासाने खोटी उत्तरं दिली. आम्ही सगळयांची टेस्ट घेऊ, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसी खाक्या दाखवत कठोरपणे चौकशी केल्यावर पूनमचं बिंग उघडं पडलं आणि तिने चारही हत्यांची कबुली दिली. आता जियाच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे, तिचे वडील दीपक यांनी पानीपतच्या सेक्टर 29 येथील औद्योगिक पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीदरम्यान पूनम म्हणाली, “आमचे लग्न झाल्यानंतर, जेव्हा माझा मुलगा शुभम जन्माला आला, तेव्हा घरी सगळे मला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की कुटुंबातील इतर मुलं पूनमच्या मुलापेक्षा जास्त देखणी आहेत. यामुळे माझ्या मनात कनिष्ठतेची खोलवर भावना निर्माण झाली. हळूहळू हे द्वेष आणि मत्सरात बदलले.” असं तिने कबूल केलं.
आणखी दोघे होते टार्गेट
चौकशीदरम्यान पूनमने असंही सांगितलं की ती कुटुंबातील आणखी दोघांना मारण्याचा कट रचत होती, त्यात तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. मात्र आता पूनम तुरूगांत गजाआड आहे, पोलिस चारही प्रकरणांमध्ये पुढील तपास व कारवाई करत आहेत.