वसईच्या तहसील कार्यालयात हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराचा धुडगूस, महत्त्वाची कागदपत्रं फाडली

| Updated on: Jul 02, 2021 | 10:46 AM

वसईच्या तहसील आणि सेतू कार्यालयात हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराने धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वसईच्या तहसील कार्यालयात हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराचा धुडगूस, महत्त्वाची कागदपत्रं फाडली
हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराचा वसई तहसील ऑफिसमध्ये धुडगूस
Follow us on

वसई : वसईच्या तहसील आणि सेतू कार्यालयात हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराने धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना युसूफ अली या पत्रकाराने शिव्या देत धमकीही दिली. (Hindi Newspaper journalist Commotion important documents torn in Vasai tehsil office)

तहसील कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पत्रकाराची शिवीगाळ

सेतू कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयकार्ड विचारत टेबलावरील उत्पन्नाचे दाखले फाडून, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अर्वाच्य भाषेत युसूफ अली या पत्रकाराने धमक्या दिल्या आहेत. गुरुवारी दुपारी साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून तहसील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला.

पत्रकाराविरोधात पोलिसांत गुन्हा

दुसरीकडे हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. युसूफ अली असे धुडगूस घालणाऱ्या पत्रकाराचे नाव असून तो ‘स्वतंत्र सागर’ या हिंदी साप्ताहिकाचा पत्रकार आहे.

कारकून प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून युसूफ अली या पत्रकारावर कागदपत्र फाडून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साप्ताहिक आणि युट्युब चॅनलच्या पत्रकारांच्या अर्वाच्य वागण्याने होणाऱ्या त्रासामुळे शासकीय कर्मचारी मात्र हतबल झाले असून, आम्ही काम करायचे की नाही अशा संतापजनाक भावना व्यक्त केल्या जात आहेत.

(Hindi Newspaper journalist Commotion important documents torn in Vasai tehsil office)

हे ही वाचा :

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

सीबीआयच्या हाती सुपारी व्यापाऱ्यांची जंत्री, संत्रीनगरीत छापेमारी, 15 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि…