संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट, थेट घर पेटवून दिलं, बुलडाण्यात जावयाला बेड्या

| Updated on: Oct 05, 2021 | 10:39 PM

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरगुती वादातून भांडण झाल्यामुळे जावयाने घराला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. घराला आग लावून पूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनाळा पोलीसांनी सोमवारी (4 ऑक्टोबर) जावयाला अटक केली आहे.

संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट, थेट घर पेटवून दिलं, बुलडाण्यात जावयाला बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us on

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरगुती वादातून भांडण झाल्यामुळे जावयाने घराला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. घराला आग लावून पूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनाळा पोलीसांनी सोमवारी (4 ऑक्टोबर) जावयाला अटक केली आहे.

फोन फोडून टाकला, मुलीला मारहाण केली

मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्याच्या टुनकी येथील कस्तुराबाई मंडासे या महिला तसेच त्यांची मुलगी आणि नातवंडे घरी होत्या. यावेळी त्यांचा जावई अंबादास झाल्टे हा दारु पिऊन त्यांच्या घरी आला. तसेच काही वेळा फोनवर बोलला. त्यानंतर त्याला मोबाईल परत मागितला असता त्याने कस्तुरबाईसह मुलीला शिवीगाळ केली. तसेच मोबाईल जमिनीवर आदळून फोडून टाकला. यावेळी मोबाईल का फोडला ? असे विचारले असता त्याने कस्तुरबाईच्या मुलीला लाथाबुक्क्याने मारहण करुन जिवे मारुन टाकेल, अशी धमकी देखील दिली.

जावयाने थेट घर पेटवून दिले

तसेच नंतर घर पेटवून देण्याची धमकी दिली. मात्र जावई अंबादास झाल्टे हा एवढ्यावरच न थांबता त्याने प्रत्यक्षपणे घर पेटवून दिले. यामध्ये कस्तुरबाई यांच्या घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि जीवनावश्यक वस्तू जळून गेल्या आहेत. यामध्ये सुदैवाने मुली आणि नातवंडांसह घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.

जावयाला बेड्या, गुन्हा दाखल

हा प्रकार घडल्यानंतर कस्तुरबाई यांनी जावयाविरोधात सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी अंबादास झाल्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.

जालन्यात अल्पयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या एका अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर जालन्यात सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तीन आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणीला शासकीय नोकरीचे अमिष दाखवून आरोपी अविनाश जोगदंड आणि गणेश काकडे यांनी जालना येथे आणले, यावेळी या तरुणांनी इतर दोन आरोपींसोबत या पीडितेची ओळख करून दिली. त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी महिनाभर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

इतर बातम्या :

साताऱ्यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर, आरोपी फरार

नागपुरात 7 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना बेड्या, पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात

बीस साल बाद ! तीन खून, 80 वर्षाचा म्हातारा आणि पुन्हा खून, काळ पुन्हा परतला

(house set into fire by Son in law in buldhana district police registered case)