साताऱ्यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर, आरोपी फरार

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे.

साताऱ्यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर, आरोपी फरार
प्रातिनिधिक फोटो
संतोष नलावडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Oct 05, 2021 | 7:13 PM

सातारा : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. सातारा शहरातील एका उपनगरात एका 12 च्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काका दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Twelve-year-old girl tortured in Satara, minor girl two months pregnant, accused absconding)

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.

मुंबईच्या अल्पवयीन मुलीवर जालन्यात सामूहिक अत्याचार

मुंबईच्या एका अल्पवयीन तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तीन आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पीडित तरुणीला शासकीय नोकरीचे अमिष दाखवून आरोपी अविनाश जोगदंड आणि गणेश काकडे यांनी जालना येथे आणले, यावेळी या तरुणांनी इतर दोन आरोपींसोबत या पीडितेची ओळख करून दिली. त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी महिनाभर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

यावेळी तरुणीने औरंगाबाद गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन सिडको पोलीस ठाण्यात झिरो एफ.आय.आर. दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी तिघा आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यात वहिनीवर बलात्कार, चुलत दिराला अटक

दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला. (Twelve-year-old girl tortured in Satara, minor girl two months pregnant, accused absconding)

मुंबईच्या अल्पवयीन मुलीवर जालन्यात सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

Coimbatore Rape Case : बलात्कार झाला की नाही, त्यासाठी IAF मध्ये टू फिंगर टेस्ट केली? हवाईदल प्रमुखांचा पहिल्यांदाच खुलासा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें