Coimbatore Rape Case : बलात्कार झाला की नाही, त्यासाठी IAF मध्ये टू फिंगर टेस्ट केली? हवाईदल प्रमुखांचा पहिल्यांदाच खुलासा

कोयंबतूर (Coimbatore) आयएएफ प्रशिक्षण केंद्रातील (IAF Training Academy) महिला अधिकाऱ्यासोबत सिनिअर अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला.

Coimbatore Rape Case : बलात्कार झाला की नाही, त्यासाठी IAF मध्ये टू फिंगर टेस्ट केली? हवाईदल प्रमुखांचा पहिल्यांदाच खुलासा
पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला. मात्र, पीडितेसोबत अशी कुठलीही चाचणी केली गेली नसल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिली आहे.

नवी दिल्ली: कोयंबतूर (Coimbatore) आयएएफ प्रशिक्षण केंद्रातील (IAF Training Academy) महिला अधिकाऱ्यासोबत सिनिअर अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला. मात्र, पीडितेसोबत अशी कुठलीही चाचणी केली गेली नसल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (VR Chaudhari ) यांनी दिली आहे. ( No two-finger test done: IAF chief VR Chaudhari on Coimbatore rape case )

सैन्यातील बलात्काराच्या या घटानेचे देश हादरला आहे. त्यातच पुन्हा पीडितेसोब टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याच्या आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्हं निर्माण झालं होतं, मात्र असं काहीही झालं नसल्याचं चौधरी म्हणाले. सैन्याच्या कोईंबतूर प्रशिक्षण अकादमीमध्ये सहकारी महिला अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अटक झाली, त्यानंतर काही दिवसांनी भारतीय हवाई दलाला फ्लाइट लेफ्टनंटचे कोर्ट मार्शल करण्याची परवानगी देण्यात आली. हवाई दल आणि तामिळनाडू पोलिसांमधील अधिकार क्षेत्रातील वाद पाहता न्यायालयाने आयएएफला त्याच्या अधिकाऱ्याविरोधात तपास सुरू करण्याची परवानगी दिली होती.

पीडितेने तक्रार केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला तामिळनाडू पोलिसांच्या महिला विंगने 26 सप्टेंबर रोजी अटक केली. असा आरोप आहे की, छत्तीसगडच्या दुर्ग येथील या अधिकाऱ्याने प्रशिक्षण अकादमीमध्ये इन्स्पिरेशन कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. या अधिकाऱ्याने महिलेने दावा केला होता की, हवाई दलाचे काही अधिकारी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. कोयम्बतूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, 9 सप्टेंबर रोजी फ्लाइट लेफ्टनंटने तिच्या क्वार्टरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, जेव्हा ही घटना महिलेने वरिष्ठांना सांगितली, तेव्हा या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं सांगत, वरिष्ठांनी आरोप फेटाळले असं या अधिकारी महिलेनं सांगितलं आहे.

पीडित अधिकारी महिला म्हणाली, ‘मला आजारी वाटत होतं, मला हे समजत होतं की, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वागणुकीमुळे माझ्यावर बलात्कार करणारा दोषी अधिकारी मोकाट सुटणार आहे. त्यामुळं माझ्या वेदना अधिक वाढल्या होत्या. मला अडीचच्या सुमारास पॅनीक अॅटॅक आला आणि मला एअर फोर्स हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. मला गोळ्या दिल्या गेल्या, कारण मला झोप येत नव्हती आणि मला श्वास घेण्यासही खूप त्रास होत होता. मला एक दिवसाची विश्रांती देण्यात आली ‘

एफआयआरमध्ये महिलेने असाही आरोप केला आहे की, तिच्यावर प्रभारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तिने सादर केलेल्या सर्टफिकेटमध्ये बदल करण्यात आले, ज्यात तिच्या मेडिकल कनडिशनची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तिने असेही आरोप केले की संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगाराविरोधातील पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा:

Lakhimpur Violence: हाच तो Video ज्यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात, मंत्र्याच्या पोराच्या पलायनाचं प्रुफ?

Priyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI