मुंबईच्या अल्पवयीन मुलीवर जालन्यात सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

पीडित तरुणीला शासकीय नोकरीचे अमिष दाखवून आरोपी अविनाश जोगदंड आणि गणेश काकडे यांनी जालना येथे आणले. त्यानंतर आरोपींनी जालना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिनाभर तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप आहे.

मुंबईच्या अल्पवयीन मुलीवर जालन्यात सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
सांकेतिक फोटो

जालना : मुंबईच्या एका अल्पवयीन तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तीन आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणीला शासकीय नोकरीचे अमिष दाखवून आरोपी अविनाश जोगदंड आणि गणेश काकडे यांनी जालना येथे आणले, यावेळी या तरुणांनी इतर दोन आरोपींसोबत या पीडितेची ओळख करून दिली. त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी महिनाभर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तिघा आरोपींना पोलीस कोठडी

यावेळी तरुणीने औरंगाबाद गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन सिडको पोलीस ठाण्यात झिरो एफ.आय.आर. दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी तिघा आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याकडून दोन वेळा बलात्कार

दुसरीकडे, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मेव्हण्याने चालत्या गाडीत दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उघडकीस आली होती. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने बाजारात जात असताना मेव्हण्याने बळजबरीने तिचं तोंड दाबून तिला गाडीत बसवलं. त्यानंतर चालत्या गाडीतच तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील माळीपुरा परिसरातील 17 वर्षीय मुलीचा वाढदिवस होता. जालना येथील तिचा मोठ्या बहिणीचा नवरा तिच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे सासऱ्यांकडे आला. पीडित मुलगी म्हणजेच मेव्हणीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून कपडे घेऊन देतो, असं सांगत तिला कपड्याच्या दुकानात घेऊन गेला.

त्या ठिकाणी आरोपीने तिला कपडेही घेतले, मात्र मेव्हणीला घरी न सोडता त्याने आधीपासूनच जुन्या मेहकर रोडवर उभ्या असलेल्या गाडीत तोंड दाबून बळजबरीने टाकले आणि जालन्याकडे घेऊन गेला. यावेळी मेहुण्याने चालत्या कारमध्येच अल्पवयीन पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे.

पुण्यात वहिनीवर बलात्कार, चुलत दिराला अटक

दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.

संबंधित बातम्या :

डोंगरावर नेऊन दिराचा वहिनीवर बलात्कार, ओढणीने गळा दाबून हत्या, पुण्यात खळबळ

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI