AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले, बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारे बेचनप्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे फर्निचर तयार करण्याचे काम करतात. हे दोघे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. हे दोघे रात्री गावी जाण्यासाठी कल्याण स्टेशनला निघाले होते.

रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले, बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले, बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 4:21 PM
Share

डोंबिवली : रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले. बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला. दुसऱ्याला मेलेला समजून लुटारु पसार झाले. ही धक्कादायक घटना डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात घडली आहे. वाचलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र लूटीच्या इराद्याने झालेल्या घटनेमुळे कल्याण डोंबिवली हादरली आहे. याबाबत टिळकनगर पोलीस अधित तपास करीत आहेत. (One was beheaded with the intention of robbery; Shocking incident in Dombivli)

खंबाळपाडा परिसरात घडली घटना

कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा 90 फीट रोड हा गुन्हेगाराचा अड्डा ठरला आहे. दिवसा प्रेमी युगलांची गर्दी असते. तर रात्रीच्या वेळीस गर्दुल्यांचा वावर असतो. डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारे बेचनप्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे फर्निचर तयार करण्याचे काम करतात. हे दोघे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. हे दोघे रात्री गावी जाण्यासाठी कल्याण स्टेशनला निघाले होते. रिक्षा खंबाळपाडा परिसरात पोहचताच काही लोकांनी रिक्षा थांबिवली. दोघांना रिक्षाबाहेर काढले. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घेऊन दोघांना मारहाण केली. यात एकाचा गळा कापला. दुसरा जखमी अवस्थेत झाडी झुडपात पडला. त्याला मयत समजून या दोघांकडून जी काही रोकड होती, ती घेऊन लूटारु पसार झाले. दोघांची बॅग आणि मोबाईल रेल्वे ट्रकच्या बाजूला सापडले आहेत.

लूटीच्या इराद्याने घडली घटना

सकाळी वाचलेला बबलू हा आपल्या परिसरात पोहचला. भाजपचा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना या प्रकरणाची माहिती मिळताच जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलिस ठाण्यात पोहचले. बबलूला सुद्धा माहिती नव्हते की त्याचा मित्र बेचन जिवंत आहे की, मेला आहे. घटना कुठे घडली आहे हे पाहण्यासाठी कांबळे हे जखमी बबलूला घेऊन रेल्वे स्टेशन परिसरात पोहचले. त्याठिकाणी बेचनचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. लूटीच्या इराद्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. तसेच घटनेतील रिक्षा चालकाचाही पोलीस शोध घेत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कल्याण डोंबिवली हादरली आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता पोलिसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. (One was beheaded with the intention of robbery; Shocking incident in Dombivli)

इतर बातम्या

माळीवाड्यातील पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई, औरंगाबादनंतर नाशिक, गुजरातेतही लूटमार

पोलिसाची फोनवरुन धमकी, भीतीपोटी तरुणाची विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.