नागपुरात 7 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना बेड्या, पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात

पोलिसांनी 7 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज पकडले असून दोन आरोपींनादेखील अटक करण्यात आलंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे ड्रग छत्तीसगड राज्यातून आणले गेले होते. या ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाईंट कोण याचा तपास पोलीस करत आहेत.

नागपुरात 7 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना बेड्या, पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात
सांकेतिक फोटो


नागपूर : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची सर्चा सुरु असतानाच दुसरीकडे नागपूर शहरात गुन्हे शाखा पोलिसांनी ड्रग्ज तस्करीबाबत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज पकडले असून दोन आरोपींनादेखील अटक केलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे ड्रग छत्तीसगड राज्यातून आणले गेले असून तस्करीचा मास्टरमाईंट कोण याचा तपास पोलीस करत आहेत.

शहरातील संत्रा मार्केट परिसरातील लॉजमध्ये पोलिसांची कारवाई

बाहेरच्या राज्यातून नागपुरात एमडी ड्रग्ज येत असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांना समजली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील संत्रा मार्केट परिसरातील एका लॉजमध्ये कारवाई केली. पोलिसांना या ठिकाणी दोन आरोपी सापडले. या आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या आरोपींकडू एमडी ड्रग्ज सापडले आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत 7 लाख रुपये आहे.

मास्टरमाईंड कोण, पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान, सध्या या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. नागपुरात बाहेरच्या राज्यातून ड्रग्ज कसा येत होता. त्याची तस्करी कोणाच्या मार्फत होत होती. यामागे खरा मास्टरमाईंड कोण आहे ? याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.

 आर्यन खानला सात ऑक्टोबरर्यंत एनसीबी कोठडी

दरम्यान, रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव समोर आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आर्यन खान तसेच इतर तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीतर्फे कोर्टात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 लाख 33 हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात सापडले आहेत. या प्रकरणात आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी 4 ऑक्टोबर रोजी कोर्टात जामीन मिळण्यासाठी युक्तिवाद केला होता. आर्यनला आयोजकांनी विशेष निमंत्रण देऊन बोलवलं होतं. त्याच्याकडे बोर्डिंग पास किंवा तिकीटही नव्हतं. त्याच बरोबर क्रुझवर बोर्डिंग करताना झालेल्या चौकशीत त्याच्याकडे काहीच सापडलेलं नव्हतं, असं मानेशिंदे म्हणाले होते. मात्र आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Coimbatore Rape Case : बलात्कार झाला की नाही, त्यासाठी IAF मध्ये टू फिंगर टेस्ट केली? हवाईदल प्रमुखांचा पहिल्यांदाच खुलासा

रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले, बेदम मारहाण करीत एकाचा गळा कापला; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

माळीवाड्यातील पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई, औरंगाबादनंतर नाशिक, गुजरातेतही लूटमार

(Nagpur Crime Branch Police seized MD drugs arrest two accuse)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI