बीस साल बाद ! तीन खून, 80 वर्षाचा म्हातारा आणि पुन्हा खून, काळ पुन्हा परतला

20 वर्षांपूर्वी 1991 मध्येही मृत नंदकिशोर महतो यांच्या कुटुंबातील तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या कुटुंबातील दोन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली होती.

बीस साल बाद ! तीन खून, 80 वर्षाचा म्हातारा आणि पुन्हा खून, काळ पुन्हा परतला
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 6:31 PM

जमुई : रात्रीच्या सुमारास एका 80 वर्षीय वृद्धाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदर पोलीस स्टेशन परिसरातील बिचवे गावात घडली आहे. रात्री 1 च्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत वृद्धाची हत्या करण्यात आली. नंदकिशोर महतो असे मयत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सशस्त्र गुन्हेगारांचा या हत्या प्रकरणात समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण गाव दहशतीत आहे, तर मृतांच्या कुटुंबियांची स्थिती अत्यंत वाईट आहे. (An 80-year-old man was shot dead out of remorse in bihar)

20 वर्षांपूर्वीही मयताच्या घरातील तिघांची झाली होती हत्या

घटनेची माहिती मिळताच सिकंदरा पोलिसांसह एसडीपीओनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. वृद्धाच्या हत्येमागे जमिनीचा वाद आणि जुने वैर सांगितले जात आहे. रात्री उशिरा वृद्धाच्या हत्येमुळे संपूर्ण गाव हैराण झाले आहे. 20 वर्षांपूर्वी 1991 मध्येही मृत नंदकिशोर महतो यांच्या कुटुंबातील तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या कुटुंबातील दोन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली होती.

या घटनेत नंद किशोर महतो यांच्या काकू, पत्नी आणि एका मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, तर तीन वर्षांपूर्वी मृत नंद किशोर महतो यांच्या मुलाला आरटीआय कार्यकर्ते वाल्मिकी यादव यांच्यासह दोन लोकांच्या हत्येसाठी आरोपी बनवण्यात आले होते. मृताचा मुलगा श्रावण महतो याने सांगितले की, सशस्त्र गुन्हेगारांनी त्याच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचे वडील रोजच्याप्रमाणे घराच्या व्हरांड्यात बाहेर झोपले होते.

जमिनीच्या वादातून आणि परस्पर वैमनस्यातून हत्या झाल्याची माहिती

या घटनेदरम्यान बोलेरो गाडीही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृताच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ही हत्या जमिनीच्या वादातून आणि परस्पर वैमनस्यातून झाली आहे. असे सांगण्यात येत आहे की, जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार मयत मयत नंदकिशोर महतो सांभाळत असत. घटनास्थळी पोहचलेले एसडीपीओ राकेश कुमार यांनी सांगितले की, वृद्धाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाकडे पाहिल्यावर कळते की, गोळी जवळून मारली गेली आहे. हत्येच्या कारणाची माहिती मिळताच पोलीस सर्व मुद्द्यांवर कारवाई करत आहेत. एसडीपीओने सांगितले की, घटना घडल्यानंतर, ज्या मार्गांनी गुन्हेगार पळून गेले आहेत त्या सर्व मार्गांचा शोध घेतला जात आहे, गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल. (An 80-year-old man was shot dead out of remorse in bihar)

इतर बातम्या

मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंगसह Poco चा नवा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

जावयाचं डोकं फिरलं, सासू सासऱ्यांवर थेट पेट्रोल टाकून काडी लावली, काय काय घडलं?

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.