मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंगसह Poco चा नवा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

पोको ब्रँड भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात हळूहळू लोकप्रिय होत आहे. या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाओमीपासून विभक्त झालेला पोको ब्रँड आता लवकरच नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.

मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंगसह Poco चा नवा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
Poco new 5G phone

मुंबई : पोको ब्रँड भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात हळूहळू लोकप्रिय होत आहे. या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाओमीपासून विभक्त झालेला पोको ब्रँड आता लवकरच नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. या आगामी फोनचे नाव Poco M4 5G आहे. Poco चा हा आगामी स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. M3 Pro 5G काही महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च झाला आहे, या फोनला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. (Poco new 5G phone is coming soon with fast charging and strong battery)

Poco M4 Pro 5G अनेक बेंचमार्क आणि सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला आहे. तसेच, पोकोचा हा आगामी फोन युरेशियन इकॉनॉमिक्स कमिशन (ईईसी) आणि कंप्लसरी सर्टिफिकेट ऑफ चायना (3C) वर दिसला आहे. या व्यतिरिक्त, हा फोन सर्टिफिकेशन साइट IMEI आणि TENAA वर देखील पाहायला मिळाला आहे. ज्याची माहिती टिपस्टरकडून प्राप्त झाली आहे. यासह, या फोनच्या काही वैशिष्ट्यांविषयी माहिती देखील प्राप्त झाली आहे.

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनला सर्वप्रथम EEC, 3C, IMEI आणि TENAA सर्टिफिकेशनवर स्पॉट केल्याची माहिती टीपस्टर अभिषेक यादवने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर ट्विट करून दिली होती. या हँडसेटचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे. तसेच, हा पोको हँडसेट 33W फास्ट चार्जिंगसह येईल. याशिवाय, एका वेगळ्या ट्विटमध्ये, Kacper Skrzypek ने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. पोकोच्या आगामी स्मार्टफोनचा मॉडेल नंबर 21091116AG असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सूचित करते की पोको एम 4 प्रो 5 जी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर मिळेल.

Poco M4 Pro 5G स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चे अपग्रेडेड मॉडेल असेल, जे भारतात जूनमध्ये लाँच करण्यात आले होते. Poco M4 Pro 5G मध्ये 6.53 इंचांचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 × 2340 पिक्सेल आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजचा पर्याय आहे, ज्याची सध्या किंमत 12990 रुपये आहे.

या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे. या व्यतिरिक्त, इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सेलचे आहेत, जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) आणि 6000 एमएएच बॅटरीसह येतो.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Poco new 5G phone is coming soon with fast charging and strong battery)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI