AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह Poco चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, बम्पर डिस्काऊंटसह सेल लाईव्ह

भारतात Poco C31 या स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.

5000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह Poco चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, बम्पर डिस्काऊंटसह सेल लाईव्ह
Poco C31
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 2:13 PM
Share

मुंबई : Poco ने भारतात अगदी स्वस्तात मस्त असा Poco C31 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लाँच केला. एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान या फोनचे लाँचिंग करण्यात आले. या फोनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फिचर्स आहेत. यात 5000mAh बॅटरी, MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध होणार आहे. (Poco C31 sale live on flipkart with 10 percent discount, know price, features and offer)

भारतात Poco C31 या स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन लाँच केल्यापासून दोन्ही प्रकार 500 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी केले जाऊ शकतात. Poco चा हा फोन जर तुम्ही अॅक्सिस बँक किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून खरेदी केला तर तुम्हाला या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जाईल. तर फ्लिपकार्टवर रविवारपासून (3 ऑक्टोबर) या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. हा फोन फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा भाग आहे.

Poco C31 या फोनचा डिस्प्ले 6.53-इंच HD+ डिस्प्ले 20:9 aspect रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी TUV Rheinland रिडींग मोड देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करतो. या फोनचे इंटर्नल स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक हा पर्यायही देण्यात आला आहे.

या फोनमध्ये तीन कॅमेरा आहेत. यातील पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. हा स्मार्टफोनमध्ये रॉयल ब्लू आणि शॅडो ग्रे या दोन कलर टोनमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Poco C31 sale live on flipkart with 10 percent discount, know price, features and offer)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.