
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरण ताजं असतनाच महाराष्ट्र एटीएसने काल संध्याकाळी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. ठाण्यातील कळवा येथील रविकुमार वर्माचा असे आरोपीचे नाव आहे. तो नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो. त्याने भारतातील 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पुरवली होती. पण त्याच्याकडे ही माहिती कोण मागायचं? तसेच त्याला टास्क कसा द्यायचे? याबाब माहिती समोर आली आहे.
रवी वर्माला अटक झाल्यानंतर सोमवारी दुपारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपीला पोलीस कोठडी मागणी केली. तसेच तो ज्या ठिकाणी काम करीत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम, आणखी तपास शिल्लक असल्याचे सांगितले. रवी ज्या ठिकाणी काम त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचे सांगत न्यायमूर्ती यांनी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरासे आणि शिंदे यांनी मात्र सदर प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवीं वर्मा याला फसविण्याचा प्रकार दिसत आहे असे म्हटले.
न्यायालयामध्ये कुठलाही सबळ पुरावा दिला नाही. शिंदे आणि गिरासे म्हणाले की कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नसल्याचे सांगत त्याच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचं आहे? कुणाकडे जायचे आहे? याबाबतच्या नोंदनी सापडल्या आहेत.
खात्यातून केवळ २ हजार भाचीला
दरम्यान, रवी वर्माच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याच्या दाव्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी दोन हजार रुपयाची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीने पाठवल्याचं समोर आल आहे. बचाव पक्षाच्या वकिलांच म्हणणं आहे की सदर प्रकरणांमध्ये रवींद्र वर्मा याला अडकविण्यात येत आहे. तो मुळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत असं कुठल्याही पद्धती देशद्रोही कृत्य केलं नसून सदर प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करीत अडकविण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी सांगितले आहे