AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी बॉयफ्रेंडसोबत झोपली होती, अचानक पती आला… त्यानंतर जे घडलं ते ऐकून विश्वास बसणार नाही

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे चार मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पण त्यानंतर जे घडले, ते ऐकून कोणाच्याही पाया खालची जमीन सरकेल.

पत्नी बॉयफ्रेंडसोबत झोपली होती, अचानक पती आला... त्यानंतर जे घडलं ते ऐकून विश्वास बसणार नाही
Wife sleeping with BFImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 16, 2025 | 6:29 PM
Share

आजच्या काळात विवाह आणि प्रेमात फसवणूक हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. देश-विदेशातून दररोज फसवणुकीच्या बातम्या समोर येतात. असेच एक धक्कादायक प्रकरण झारखंडच्या जमशेदपूरमधील आदित्यपूर शहरातून समोर आले आहे. एका चार मुलांच्या आईचे दुसऱ्या पुरुषाशावर प्रेम असते. प्रेमापर्यंत ठीक होते, पण त्यानंतर जे घडले, त्याने सर्वांनाच धक्का बसला. चला, या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊया.

प्रकरण काय आहे?

जमशेदपूरच्या आदित्यपूर शहरातील हे प्रकरण आहे, जिथे सीता मार्डी या महिलेला भोला उर्फ रितेश बिरुवा याच्याशी प्रेम झाले. गेल्या एका वर्षापासून सीता भोलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. इतकेच नव्हे, तिने आपला पती राजेंद्र मार्डी आणि चार मुलांना सोडले होते. राजेंद्र याला यामुळे खूप त्रास होत होता, पण तो सर्व काही सहन करत आपल्या मुलांची काळजी घेत होता. त्रस्त होऊन त्याने अनेकदा भोलाला मारहाणही केली होती. वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

जेव्हा दोघे झोपले होते…

गुरुवारी रात्री, राजेंद्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो कुऱ्हाड घेऊन थेट भोलाच्या घरी पोहोचला. रात्रीची वेळ होती आणि सीता व भोला दोघेही झोपले होते. याचवेळी राजेंद्रने कुऱ्हाडीने सीता आणि भोलावर सलग हल्ला केला. या हल्ल्यात भोलाचा जागीच मृत्यू झाला, तर सीता गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकारी विनय कुमार सिंग यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भोलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तर सीतेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पूर्वनियोजित हल्ला आणि मग…

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. असे सांगितले जाते की, राजेंद्र आपल्या मुलांना भेटण्यासाठी नेहमीच भोलाच्या घरी जायचा, पण भोला प्रत्येक वेळी त्याच्याशी भांडण करायचा आणि मारहाण करून हुसकावून लावायचा. भोलाने मुलांशीही गैरवर्तन केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे राजेंद्र आणखी संतप्त झाला होता. सततच्या अपमानामुळे आणि मुलांच्या दयनीय अवस्थेमुळे राजेंद्रच्या मनात सूडाची आग भडकली. त्याने अनेक दिवस हत्येची योजना आखली आणि अखेरीस गुरुवारी रात्री त्याने ही घटना घडवून आणली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, राजेंद्रने आपला राग आणि प्रेम गमावण्याच्या भीतीमुळे हे कृत्य केले. पोलिस पुढील तपास करत असून, लवकरच आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.