AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

मधुचंद्राच्या रात्रीच एका नवरीने नवऱ्याचे सर्व स्वप्ने उद्ध्वस्त केले. सजून-धजून नवरा खोलीत बेडवर नवरीची वाट पाहत होता, पण ती नवरीने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला...

मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्...
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 15, 2025 | 8:59 PM
Share

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका सामान्य कुटुंबात हा प्रकार घडला. मोठ्या आशा आणि स्वप्नांसह एका तरुणाने लग्न केलं. सुहागरातच्या रात्रीसाठी त्याने विशेष तयारी केली होती. नवरीने नवऱ्याला आणि सासूला “थांबा, मी येते” असं सांगून स्वयंपाकघरातून दूध आणलं. पण या दूधातून जे घडलं, ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

कशी झाली फसवणूक?

लग्न ठरवणाऱ्या एका मध्यस्थ महिलेनेच नवरीच्या बाजूने 1.20 लाख रुपये मागितले, कारण “मुलगी गरीब आहे आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी मदत हवी” असं सांगितलं गेलं. नवऱ्याच्या कुटुंबाने कसेबसे पैसे जमवले आणि ठरलेल्या तारखेला लग्न थाटामाटात पार पडलं. सर्व रितीरिवाजाने, पाहुणचार आणि मोठ्या उत्साहात पार पडले. Video: सापासमोर ‘नागिन धून’ वाजवली तर… एका मुलाने केलेला प्रयोग कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हाल चकीत

नशीला दूध आणि रात्रीची चोरी

लग्नानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. नव्या सूनेच्या स्वागतात गाणी गायली जात होती. नवरा सुहागरातच्या तयारीत मग्न होता, पण त्याला काय माहीत की ही रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे. रात्री नवरीने सासू आणि नवऱ्याला दूध दिलं, ज्यात नशीली औषध मिसळलेलं होतं. सासू तात्काळ बेशुद्ध झाली आणि नवरा गाढ झोपेत गेला. रात्रीच्या अंधारात, जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा नवरीने घराचा मुख्य दरवाजा उघडला. बाहेर एक बाईकस्वार तिची वाट पाहत होता. तिने आपल्या बॅगेत रोकड आणि दागिने भरले. त्यानंतर त्या बाईकवर बसून ती फरार झाली.

सकाळी उठल्यावर बसला धक्का

सकाळी जेव्हा घरच्यांची झोप उघडली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. घराची तपासणी केली असता 1.30 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचं आढळलं. साखरपुड्याची अंगठी, चांदीच्या पायघड्या, चैन आणि इतर दागिने गायब होते. नवऱ्याचं तर हृदयच तुटलं. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका फुटेजमध्ये एक महिला बाईकवर बसून जाताना दिसली. बाईकचा नंबरही स्पष्ट दिसला, ज्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

बनावट आधार कार्ड आणि खोटे नातेवाईक

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली की, नवरीने लग्नावेळी दिलेलं आधार कार्ड बनावट होतं. इतकंच नव्हे, तर लग्नात मामा-मामी, काका-काकी म्हणून आलेले लोकही खोटे होते. पीडित कुटुंबाने स्थानिक जनप्रतिनिधींशी संपर्क साधला, ज्यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल झाली. सध्या पोलिस या टोळीचा शोध घेत असून, इतर प्रकरणांचाही तपास करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.