AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: सापासमोर ‘नागिन धून’ वाजवली तर…? एका मुलाने केलेला प्रयोग कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हाल चकीत

इंटरनेटचे जग कमालीचे आहे. येथे दररोज काहीतरी नवीन आणि आश्चर्यकारक पाहायला मिळते, जे आपल्याला थक्क करते. आता एक अनोखा प्रसंग पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

Video: सापासमोर 'नागिन धून' वाजवली तर...? एका मुलाने केलेला प्रयोग कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हाल चकीत
Snake dance on Nagin dhoonImage Credit source: Social Media
| Updated on: May 12, 2025 | 11:58 AM
Share

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण पाहिले आहे की, जेव्हा गारुडी बीन वाजवतो, तेव्हा साप नाचू लागतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, इंस्टाग्रामवर बिहारच्या एका मुलाने असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमध्ये एक साप जमिनीवर सरपटताना दिसतो. तेवढ्यात ही मुले मोबाईलवर ‘नागिन धून’ वाजवतात. त्यानंतर साप जे काही करतो, तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की एका दिवसात त्याला २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले.

हा व्हिडिओ १ मे रोजी @vishal_bihari__04 या इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओला २५.२ दशलक्ष म्हणजेच अडीच कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ९ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, १० हजारांहून अधिक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एका युजरने लिहिले, “बस कर भाऊ, नागमणी घेऊनच थांबणार का?” दुसऱ्या युजरने, “भाऊ, तो साप उष्णतेने त्रस्त आहे, बीनचा त्याच्याशी काहीही संबंध नाही” असे म्हटले आहे. काही युजर्सनी आश्चर्याने लिहिले, “भाऊ, मी आजपर्यंत फक्त टीव्हीवरच हे पाहिलं होतं, तू तर प्रत्यक्षात दाखवलं!” तर काही युजर्सनी म्हटलं की, मूक प्राण्याला असं त्रास देणं योग्य नाही. याशिवाय, काही युजर्सनी लिहिलं, “भारत नवख्या लोकांसाठी नाही.” तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा.

View this post on Instagram

A post shared by Shark typist (@shark_7781)

फोनवर वाजवली नागिन धून आणि साप नाचू लागला!

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, एक साप जमिनीवर सरपटत आहे. तो कसाबसा पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी मुले मोबाईलवर ‘नागिन धून’ वाजवतात. त्यानंतर सापाच्या हालचाली बदलतात. तो सरळ जाण्याऐवजी आपलं शरीर थोडं वेगळ्या पद्धतीने हालवू लागतो. कधी तो तोंड हलवतो, तर कधी जमिनीवर पालटू लागतो.

हे पाहून मुले आनंदी होतात आणि म्हणतात, “हा तर नाचतोय!” एक मुलगा असंही म्हणतो की, “हा पाण्याचा साप आहे.” काहीजण मस्तीत म्हणतात, “भाऊ, काढ मणी!” आता साप खरंच नाचतोय की हा फक्त योगायोग आहे? याचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पाहूनच देऊ शकता.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.