
आजच्या काळात विवाह आणि प्रेमात फसवणूक हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. देश-विदेशातून दररोज फसवणुकीच्या बातम्या समोर येतात. असेच एक धक्कादायक प्रकरण झारखंडच्या जमशेदपूरमधील आदित्यपूर शहरातून समोर आले आहे. एका चार मुलांच्या आईचे दुसऱ्या पुरुषाशावर प्रेम असते. प्रेमापर्यंत ठीक होते, पण त्यानंतर जे घडले, त्याने सर्वांनाच धक्का बसला. चला, या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊया.
प्रकरण काय आहे?
जमशेदपूरच्या आदित्यपूर शहरातील हे प्रकरण आहे, जिथे सीता मार्डी या महिलेला भोला उर्फ रितेश बिरुवा याच्याशी प्रेम झाले. गेल्या एका वर्षापासून सीता भोलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. इतकेच नव्हे, तिने आपला पती राजेंद्र मार्डी आणि चार मुलांना सोडले होते. राजेंद्र याला यामुळे खूप त्रास होत होता, पण तो सर्व काही सहन करत आपल्या मुलांची काळजी घेत होता. त्रस्त होऊन त्याने अनेकदा भोलाला मारहाणही केली होती.
वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…
जेव्हा दोघे झोपले होते…
गुरुवारी रात्री, राजेंद्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो कुऱ्हाड घेऊन थेट भोलाच्या घरी पोहोचला. रात्रीची वेळ होती आणि सीता व भोला दोघेही झोपले होते. याचवेळी राजेंद्रने कुऱ्हाडीने सीता आणि भोलावर सलग हल्ला केला. या हल्ल्यात भोलाचा जागीच मृत्यू झाला, तर सीता गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकारी विनय कुमार सिंग यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भोलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तर सीतेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पूर्वनियोजित हल्ला आणि मग…
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. असे सांगितले जाते की, राजेंद्र आपल्या मुलांना भेटण्यासाठी नेहमीच भोलाच्या घरी जायचा, पण भोला प्रत्येक वेळी त्याच्याशी भांडण करायचा आणि मारहाण करून हुसकावून लावायचा. भोलाने मुलांशीही गैरवर्तन केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे राजेंद्र आणखी संतप्त झाला होता. सततच्या अपमानामुळे आणि मुलांच्या दयनीय अवस्थेमुळे राजेंद्रच्या मनात सूडाची आग भडकली. त्याने अनेक दिवस हत्येची योजना आखली आणि अखेरीस गुरुवारी रात्री त्याने ही घटना घडवून आणली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, राजेंद्रने आपला राग आणि प्रेम गमावण्याच्या भीतीमुळे हे कृत्य केले. पोलिस पुढील तपास करत असून, लवकरच आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.