आधी नवऱ्याने ब्लेडने बायकोच नाक कापलं मग बोटांवर वार, उर्वरित भाग प्राण्यांनी खाल्ला, कुठे घडली ही घटना?
मंगळवारी दोघे पती-पत्नी संतरामपुर येथून बाइकने आपल्या गावी पाडलवा येथे परतत होते. संपूर्ण रस्ताभर राकेश पत्नीशी भांडत होता. संध्याकाळी 4.30 वाजता दोघे गावात पोहोचले.

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला मारहाण केली. नंतर तिचं नाक कापून टाकलं. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारची ही घटना आहे. राणापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील पाडलवा गावातील ही घटना आहे. राकेश (23) त्याच्या 22 वर्षीय पत्नीसोबत गुजरातच्या संतरामपुर येथे फॅक्टरीत मजुरीसाठी गेला होता. चार महिन्यापासून तिथेच काम करत होता. त्यांना एक 6 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे.
या फॅक्टरीमध्ये एक बिहारी वंशाचा मजूर सुद्धा कामाला आहे. महिला त्याच्याशी बोलायची. त्यावरुन राकेशला संशय आला. दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. त्यावरुन दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. मंगळवारी दोघे पती-पत्नी संतरामपुर येथून बाइकने आपल्या गावी पाडलवा येथे परतत होते. संपूर्ण रस्ताभर राकेश पत्नीशी भांडत होता. संध्याकाळी 4.30 वाजता दोघे गावात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली.
प्राण्यांनी नाक खाऊन टाकलेलं
विषय इतका वाढला की, पतीने आपल्या पर्समधून ब्लेड काढला व पत्नीचं नाक कापलं. इतकचं नाही ब्लेडने पत्नीच्या बोटांवर वार करुन तिला जखमी केलं. ग्रामस्थ महिलेला शोधायला गेले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की, प्राण्यांनी नाक खाऊन टाकलेलं. त्यानंतर पती जखमी पत्नीला बाइकवर बसवून उपचारासाठी राणापुर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे महिलेची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तिला झाबुआ जिल्हा रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं.
वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु
माहिती मिळताच पोलिसांनी सुद्धा कारवाई केली. राणापूर पोलीस दिनेश रावत यांनी सांगतिलं की, आरोपी पतीला अटक केली आहे. वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे.
