AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोळीचा आवाज ऐकू आला म्हणून शेजारी धावले, समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला, काय घडले नक्की?

पती-पत्नी एकत्र जेवायला बसले होते. अचानक घरातून गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून शेजारी धावत पहायला आले. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्कात बसला.

गोळीचा आवाज ऐकू आला म्हणून शेजारी धावले, समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला, काय घडले नक्की?
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 08, 2023 | 3:01 PM
Share

मुंगेर : बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीवर गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंगेर जिल्ह्यातील तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुडिया गावात ही घटना घडली. या गोळीबारात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर पती फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेला अनुमंडल रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन महिलेला भागलपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

दारुच्या नशेत पती नेहमी पत्नीला मारहाण करायचा

पती मलिक यादव आणि पत्नी प्रियांका देवी हे खुडिया गावात राहत होते. दोघा पती-पत्नीमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक यादव याला दारूचे व्यसन होते आणि दररोज पत्नीशी भांडण करायचा. रविवारी बाहेरुन आला आणि त्याने पत्नीकडे जेवण मागितले. जेवणादरम्यान पत्नीसोबत काही कारणातून त्याचा वाद झाला. वादातून त्याने प्रियांकाला बेदम मारहाण केली. मग पिस्तूल काढून पत्नीवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

गोळीचा आवाज ऐकून शेजारी धावले

गोळीचा आवाज ऐकून शेजारी मलिकच्या घरी धावले. घरी जाऊन पाहिले प्रियांका रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात नेले. आरोपी पतीच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी टाकत आहेत. पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोषीवर कडक कारवाई केली जाईल, तारापूरचे डीएसपी पंकज कुमार यांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?