AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉर्न व्हीडिओमुळे सुखाच्या संसाराला अश्लीलतेची नजर, विरोध करणाऱ्या पत्नीची काय चूक, अखेर

अश्लील व्हिडीओ पाहण्याचं तुम्हाला व्यसन असेल तर ते आणखी वाईट आहे, अश्लील व्हीडिओ पाहण्यावरुन एका सुखी संसाराला नजर लागली

पॉर्न व्हीडिओमुळे सुखाच्या संसाराला अश्लीलतेची नजर, विरोध करणाऱ्या पत्नीची काय चूक, अखेर
Jaywant Patil
Jaywant Patil | Updated on: Feb 21, 2023 | 12:40 PM
Share

सूरत : सूरत मोबाईल पाहणे, आणि त्यावर विशिष्ट प्रकारचेच व्हीडिओ पाहणे हे एक व्यसन आहे, यात तुमचे अनेक तास वाया जातात, त्याही शॉर्ट व्हीडिओ हे एक मोठं व्यसन आहे, अनेकांना हे समजत देखील नाही की, शॉर्ट व्हिडीओ पाहण्यात त्यांचे किती तास वाया गेले. हे एका दिवसासाठी नसतं, हे सतत आणि दररोज सुरु असतं, त्यातही अश्लील व्हिडीओ पाहण्याचं तुम्हाला व्यसन असेल तर ते आणखी वाईट आहे, अश्लील व्हीडिओ पाहण्यावरुन एका सुखी संसाराला नजर लागली आहे, पत्नी या वादात ओढली गेली आणि अखेर नवरा ऐकत नव्हत आणि पतीला देखील तिची ही सततची कटकट सहन होत नव्हती, अखेर संतापात जे काही झालं त्यात हा सुखाचा संसार अश्लील व्हीडिओंमुळे अर्ध्यातच राहिला असं म्हणावं लागेल, ही खूप गंभीर घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली आहे.

किशोर पटेल आणि काजल मिश्रा यांचं फक्त वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं, सूरत शहरातील कतारगाम येथील ध्रुवतारक सोसायटीत ही घटना घडली. अनेकवेळा घर रिकामं असायचं, पती किशोर पटेल हा सतत मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत होता, पण त्याची ही सवय आणखी वाईट घडवून आणणारी ठरेल असं कुणालाही वाटलं नाही. किशोर हा ज्वेलरचं काम करत होता. किशोरची ही सवय सर्वांना अवाक करणारी ठरली, तो आरोपीच्या पिंजऱ्यात आला आणि संसाराचं होतं नव्हतं झालं.

किशोरची सतत मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहण्याची सवय सुटत नव्हती, त्याचं कोणत्याही कामात एवढं मन नसायचं, अनेकवेळा त्याच्या पत्नीने हे पाहिलं, यावर त्याला समजावल, पण तो सतत, तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत होता. हा वाद टोकाला जाईल असं सतत वाटत होतं, संसारात भांड्यालं भांडं लागतंच पण, वाद एवढा मोठा होवू नये की, यात कुणाचा जीव जाईल.

एकेदिवशी अखेर ती वेळ आली, काजल आणि किशोर यांच्यात जोरदार भांडण झालं, भांडण संपेन, कुणी राग मनात ठेवणार नाही, असं होतं, आणि असंच झालं पाहिजे, पण काजल आणि किशोरच्या बाबतीत असं झालं नाही. किशोरने सर्वात मोठा मुर्खपणा केला आणि आपल्या पत्नीवर ज्वलनशील पदार्थ फेकला, तिला पेटवून दिलं. अखेर एका सुखाच्या संसाराचा अंत झाला. सध्या चौक बाजार पोलिसांनी किशोरला अटक केली आहे. पोलीस याबाबतीत अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी