UP Murder : पळून गेलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, वाचा संपूर्ण घटना!

दरम्यान, पळून गेलेले दोघेही आदर्श मंडी पोलीस ठाण्यातील मोहल्ला हरदेव नगर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याचे तिच्या पतीला समजले. सोमवारी पहाटे पती अमित त्याच्या तीन मित्रांसह घरी पोहोचला. पतीला येथे येताना पाहून पत्नी शिवांगीने मारहाण करण्यास सुरूवात केली. विरोध करताना पती अमितने शिवांगीवरही हल्ला केला.

UP Murder : पळून गेलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, वाचा संपूर्ण घटना!
Image Credit source: tv9
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 1:56 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामलीमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केलीयं. प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीला पती मारहाण करत असताना प्रियकराने प्रियसीच्या पतीचा गळा चिरून खून केला. सोमवारी पहाटे ही खळबळजनक घटना घडलीयं. पोलिसांनी (Police) घटनास्थळाहून आरोपी प्रियकर आणि पत्नीला अटक केली आहे. पंजाबमधील चंदीगड जिल्ह्यातील दुडू माजरा गावात राहणाऱ्या अमितचे सात वर्षांपूर्वी शिवांगीसोबत लग्न (Married) केले होते. 24 जून रोजी शिवांगी तिचा लहान मुलगा चिंकूसह घरासमोर राहणारा प्रियकर जतीनसोबत फरार झाली होती.

पत्नी शिवांगीने केली पतीला मारहाण

दरम्यान, पळून गेलेले दोघेही आदर्श मंडी पोलीस ठाण्यातील मोहल्ला हरदेव नगर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याचे तिच्या पतीला समजले. सोमवारी पहाटे पती अमित त्याच्या तीन मित्रांसह घरी पोहोचला. पतीला येथे येताना पाहून पत्नी शिवांगीने मारहाण करण्यास सुरूवात केली. विरोध करताना पती अमितने शिवांगीवरही हल्ला केला. त्यानंतर प्रियकर जतीन याने तर कळसच गाठला.

हे सुद्धा वाचा

प्रियकराने शिवांगीच्या पतीवर केला चाकूने हल्ला

आपल्या प्रियसीला मारहाण होताना पाहून प्रियकराने शिवांगीच्या पतीवर चाकूने हल्ला करत, त्याचावर असंख्य वार करून हत्या केली. या प्रकरणाची माहिती अमितच्या मित्रांनी आदर्श मंडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अमितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. अमितच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले आणि शिवांगी व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें