AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींची फी भरण्यासाठी थेट सेक्स लाइव्ह स्ट्रीमिंग, रिक्षा चालकाने कमावले नको त्या मार्गाने पैसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटद्वारे जोडप्याने एकट्याने रिक्षा चालवून जितके पैसे कमवू शकत होते त्यापेक्षा जास्त पैसे कमवले. यासाठी त्यांनी एचडी कॅमेरे वापरले.

मुलींची फी भरण्यासाठी थेट सेक्स लाइव्ह स्ट्रीमिंग, रिक्षा चालकाने कमावले नको त्या मार्गाने पैसे
Crime newsImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 27, 2025 | 6:27 PM
Share

हैदराबादमधील एका दाम्पत्याला मोबाइल अ‍ॅपवर त्यांच्या सेक्सचे लाइव्ह स्ट्रीमिंग केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली. या दाम्पत्याला पैशांची गरज होती आणि त्यांनी सहज पैसे कमावण्यासाठी असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दाम्पत्याकडे त्यांच्या दोन मुलींच्या कॉलेजच्या फी भरण्यास पैसे नव्हते. त्यांच्या दोन्ही मुली हुशार विद्यार्थिनी आहेत. त्यापैकी एक बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकते, तर दुसरीने नुकतीच इंटरमीडिएट परीक्षेत 470 पैकी 468 गुण मिळवले असून ती कॉलेज प्रवेशाची तयारी करत आहे. याशिवाय, पोलिसांनी सांगितले की, पती रिक्षा चालक आहे आणि त्याची प्रकृती खराब होती. त्याच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते.

सेक्स व्हिडीओ कितीला विकले जात होते?

गुरुवारी अंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगरमधून या पुरुष आणि महिलेला अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून हाय डेफिनिशन कॅमेरेसह अनेक उपकरणे जप्त करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, हे दाम्पत्य त्यांच्या सेक्सचे लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले व्हिडीओ अ‍ॅप वापरकर्त्यांसोबत शेअर करत होते. विशेषतः अशा तरुणांना जे अशा व्हिडीओसाठी पैसे देण्यास तयार होते. एका लाइव्ह व्हिडीओची किंमत 2,000 रुपये होती, तर रेकॉर्ड केलेली क्लिप 500 रुपयांना विकली जात होती.

वाचा: महाराज जात पाहून स्कॉलरशिप व नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे; किरण मानेची पोस्ट चर्चेत

कसे पकडले गेले?

पोलिसांनी सांगितले की, या रॅकेटद्वारे हे दाम्पत्य रिक्षा चालवून कमावत असलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावत होते. यासाठी त्यांनी एचडी कॅमेऱ्यांचा वापर केला. त्यांनी कथितपणे या कृतीदरम्यान आपली ओळख लपवण्यासाठी मास्क देखील घातले होते. ईस्ट झोन टास्क फोर्सने गुप्त माहितीच्या आधारे दाम्पत्याच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. व्हिडीओ खरेदी करणाऱ्यांना देखील नोटिसा जारी करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.