प्रत्येकवेळी OYO रुम बुक करतात… नंतर कपल करतात असं कांड; थेट पोलीसच पोहचली…
हैदराबादमधील ओयो हॉटेलमध्ये एका प्रेमी जोडप्याला गांजा विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे जोडपं ओयोच्या रूममधून गांजाची विक्री करत होते आणि त्यांना ऐशोआराम जगायचा होता. पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून गांजा जप्त केला आणि त्यांना अटक केली.

सध्या OYO रुमचा बोलबाला अधिक आहे. कारण OYO रुमला जोडप्यांची मागणी अधिक आहे. त्यामुळे देशभरात तुम्हाला OYO हॉटेल्स पाहायला मिळतील. पण आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबाबदमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी या हॉटेलात शिरलेल्या दोन प्रेमी जोडप्यांना अटक केली आहे. ओयोशी रसिस्टर्ड असलेल्या हॉटेलातून या कपलला पोलिसांनी अटक केली आहे. जे हॉटेल ओयोशी रजिस्टर्ड आहेत, त्या ओयोतून ते रुम बुक करायचे. नंतर असं काही कांड करायचे की बघता सोय नाही. त्यांचं हे कांड पाहून खुद्द पोलीसही हैराण झाले आहेत. पकडण्यात आलेल्या प्रेमी जोडीपैकी मुलगा आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे. तर मुलगी मध्यप्रदेशातील आहे. आता पोलीस या दोघांची कसून चौकशी करत आहे.
हे जोडपं ओयोमधून रुम बूक करून तिथे राहायचे. रुम भाड्याने घेऊन ते गांजा विकायचे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गांजा विकायचं काम करत होते. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ऐशोआरामाची जिंदगी जगण्यासाठी आम्ही गांजा विकायचो असं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या ठिकाणाहून गांजा आणून ओयोतून बुक केलेल्या रुममध्ये राहून आम्ही गांज्याचा सप्लाय करायचो, असं या दाम्पत्याने म्हटलं आहे.
OYO रूममध्ये राहायचे
नेल्लोर जिल्ह्यातील कावला येथील देवेंदुला राजू आणि मध्यप्रदेशातील संजना मांजा यांची मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघेही सोबत राहायचे. प्रचंड पैसा कमावून ऐशोआरामाचं आयुष्य त्यांना जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक प्लान तयार केला. त्यानुसार ते नेहमी ओयो रुममध्ये राहायचे. तिथूनच गांजा सप्लाय करायचे. कुणाला त्याची कुणकुणही नव्हती. आता पोलिसांनी दोघांनाही हैदराबादच्या कोंडापूरमध्ये आयो रुममधून अटक केली आहे.
रुममधून गांज्याची विक्री
आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही पैसे कमावण्याचा प्लान आखला. ओयो रुम बुक करायचो. तिथे राहायचो आणि तिथूनच गांजा विक्रीचा धंदा करायचो. कोंडापूरच्या एका ओयो रूममध्ये राहून दोघे अनेक दिवसांपासून गांज्याची विक्री करत होते. शुक्रवारी रात्री एसटीएफ टीमने या हॉटेलमध्ये छापा मारला. तपासणी केली असता त्यांना गांजा सापडला. हे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून गांजा आणायचे आणि ओयो रुममधून गांजा विकायचे. गांजा विक्रीच्या धंद्यात हे दोघेच आहेत का? यांच्या टोळीत आणखी कोण कोण आहेत? याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच यांनी आतापर्यंत गांजा विक्रीतून किती पैसा कमावला आहे, याची माहितीही पोलीस घेत आहेत.
