रत्नागिरीमध्ये चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग, मुंबई एटीएसला सुगावा लागताच दोघांना बेड्या

| Updated on: Aug 14, 2021 | 6:52 PM

रत्नागिरी शहरामध्ये बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आले आहे.

रत्नागिरीमध्ये चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग, मुंबई एटीएसला सुगावा लागताच दोघांना बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आले आहे. मुंबई एटीएसच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केलीय. (illegal international calling center found in ratnagiri two accused arrested)

 

यामध्ये गेल्या महिनाभरात 100 आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याचे उघड झाले आहे. हे कॉल नेमके कुठे आणि कशासाठी झाले याचा तपास मुंबई एटीएस आणि शहर पोलीस करत आहेत. सेंटरचे सर्व साहित्य जप्त करून शहरातील मोबाईल शॉपीच्या मालकासह पनवेल येथील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आलं आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कॉलिंग

देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय कॉल्सवर मुंबई एटीएसचे बारिक लक्ष असते. यादम्यान रत्नागिरीत एका ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कॉलिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मुंबई एटीएसला समजले. त्यांनतर मुंबई एटीएसने (दहशतवादीविरोधी पथक) रत्नागिरी एटीसीला (दहशतवादीविरोधी जिल्हा कक्ष) त्याची माहिती दिली. या माहितीनुसार रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. हे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर आठवडा बाजार येथील श्रीटेकचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात होते. तिथे मुख्य सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते.

सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमध्ये

इंटरनॅशनल कॉलिंगसाठी संशयितांनी मोठी शक्कल लढवलेली आहे. रत्नागिरीतील स्थानिक माणसाकडून इंटरनॅशनल कॉलसाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करण्यात आले होते. एका प्रसिद्ध कंपनीचे ब्रॉडबॅण्ड कनेक्शन नाशिकमधून घेण्यात आले. धक्कादायक म्हणजे सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमधील (मुंबईत) एका इमारतीत सुरू होते. त्याची माहितीदेखील पोलिसांना मिळाली होती. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी या सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय.

आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला 

या कारवाईमध्ये इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी अटक केली. तसेच या प्रकरणातील मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दुकानाचा मालक आणि रज्जाक सिद्दीकी या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलायाने दिलेत.

सर्व कॉल सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेस होतात

दरम्यान आंतरराष्ट्रीय कॉल करताना एका आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) अॅड्रेसवरून दुसऱ्या आयपी अॅड्रेसवर कॉल केला जातो. हे सर्व कॉल सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेस होतात. मात्र, आयपी अॅड्रेस टू मोबाईल किंवा लॅण्डलाईनवर कॉल केल्यास ते ट्रेस होत नाहीत. मोबाईल यंत्रणेला जेव्हा रेंज नसते, तेव्हा दहशतवादी या यंत्रणेचा वापर करतात. रत्नागिरीतून बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसच्या लक्षात आले. जवळपास 100 कॉल झाल्याने एटीएसला संशय आला आणि हा सारा प्रकार उघड झाला

इतर बातम्या :

VIDEO | कल्याणमध्ये ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा बळी; घटना सीसीटीव्ही कैद

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

VIDEO | क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची दाम्पत्याला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओवरुन संताप

(illegal international calling center found in ratnagiri two accused arrested)