Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील सातगेरिया भागात 10-12 लोक आले आणि त्यांनी वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला बेदम मारहाण केली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महिलेला गंभीर अवस्थेत पाचखुडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण
बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 4:35 PM

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये अंधश्रद्धेने कळस गाठला आहे. एका वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून बेदम मारहाण केल्याची माणुसकीला कलंक लावणारी घटना घडली आहे. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील सतगेरिया भागात ही घटना घडली आहे. मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी महिलेला मेदिनीपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक आमदाराने रुग्णालयात जाऊन वृद्ध महिलेची भेट घेतली आणि पोलिसांनी या प्रकरणावर तातडीने कारवाई करत चार महिलांसह एकूण 10 जणांना अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील सातगेरिया भागात 10-12 लोक आले आणि त्यांनी वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला बेदम मारहाण केली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महिलेला गंभीर अवस्थेत पाचखुडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. स्थानिक रुग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मेदिनीपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तेथे या महिलेवर उपचार सुरू आहेत.

मारहाण प्रकरणी 10 जणांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत 10 जणांना अटक केली. परिसरातील आमदार दिनीन रॉय वृद्ध महिलेला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आमदार स्थानिक टीएमसी नेते आणि आदिवासी नेत्यांसह रुग्णालयात पोहोचले. ही सामाजिक समस्या असल्याचे आमदार दिनीन रॉय यांनी सांगितले. कोतवाली पोलिसांनी काही आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. भारत जकात मांझी समूहाच्या सदस्यांनी ही समस्या सामाजिकरित्या सोडवण्यासाठी पुढे आले आहे. यापूर्वीही महिलेला मारहाण करण्यात आली होती. आमदार दिनीन रॉय यांनी सांगितले की, त्या बऱ्याच दिवसांपासून बेघर होत्या. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत हे पाहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जादूटोणा प्रथेबाबत जनजागृती करण्याची गरज

चेटकीण बोलून अत्याचार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा सक्त सूचना ग्रामस्थांना दिल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील लोक महिलेला डायन म्हणत त्रास देत होते. तिला मारहाणही करण्यात आली होती. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जनतेमध्ये या कुरितीविरुद्ध जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (In Bengal, an old woman was beaten up for being a witch due to superstition)

इतर बातम्या

VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी

आठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक