घरी लग्न सोहळ्याचे आयोजन, कुटुंबीय नाचत होते, अचानक घरी रक्तरंजित खेळ सुरु झाला, काय घडले नेमके?

घरी लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक नाचत होते. मात्र अचानक असे काही घडले की, लग्नघरात शोककळा पसरली. या घटनेमुळे सर्वच हादरले.

घरी लग्न सोहळ्याचे आयोजन, कुटुंबीय नाचत होते, अचानक घरी रक्तरंजित खेळ सुरु झाला, काय घडले नेमके?
पत्नीसोबत नाचणाऱ्या भावांना भावाने संपवले
Image Credit source: Google
| Updated on: May 16, 2023 | 6:28 PM

कबीरधाम : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी लग्न सोहळा होता. यामुळे सर्वजण नाचत होते. यावेळी पत्नी आपल्या दोन दिरांसह नाचली म्हणून पतीने आपल्या दोघा भावांची हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील कबीरधाम येथे घडली. एवढ्यावरच तो थांबला नाही. भावांची हत्या केल्यानंतर त्याने पत्नी, भावोजी आणि मोठ्या भावालाही जबर जखमी केले. सध्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन हद्दीतील तारेगाव जंगलातील बंगौरा गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तिन्हा बेगा याच्याविरुद्ध कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

पत्नीला भावांसोबत नाचताना पाहून पती संतापला

घरी लग्न समारंभ होता. यामुळे घरातील सर्वजण आनंदात गात आणि नाचत होते. यावेळी आरोपी तिनहा बेगाची पत्नी सनमतीबाईही सर्वांसोबत नाचत होती. सनमतीबाई आपल्या दिरांसोबत नाचत होती. पती तिनहा बेगाला ही गोष्ट आवडली नाही आणि हे पाहून तो संतापला. यानंतर संतापलेल्या पतीने सर्वांसमोर पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी केले. कसा तरी जीव वाचवून सनमतीबाई तिथून पळाली.

भावांची हत्या करत पत्नीसह तिघांना जखमी केले

यानंतर तिनहा बेगा याने पत्नीसोबत नाचत असलेले दोघे भाऊ जगत बेगा आणि टिकू यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मोठा भाऊ मोहटू बेगा आणि मेहुणा सुखराम बेगा मदतीसाठी आले असता आरोपीने त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली. नातेवाईकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तिनहा बेगाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.