वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?

एकीकडे अवकाळी आणि एकीकडे उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. पावसामुळे परिसरातील वीज खंडित करण्यात आली होती. पण उकडाही भयंकर जाणवत होता. यामुळे दाम्पत्य छतावर झोपले होते.

वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 5:28 PM

सार : सध्या गरमीचे दिवस आहेत. माणसं उकाड्याने हैराण आहेत. मात्र या उकाड्याच्या दिवसात ग्रामीण भागात वीज कपात सुरु आहे. अशीच एक घटना हरयाणात उघडकीस आली आहे. घरातील वीज गेली होती. उकाड्याने हैराण झाल्यामुळे पती-पत्नी घराच्या छतावर झोपले होते. मात्र उकाड्यापासून वाचण्यासाठी गेले आणि निसर्गाने प्राणच हिरावून नेले. दाम्पत्य रात्री छतावर झोपले असताना वादळ आले आणि वादळामुळे निर्माणाधीन भिंत कोसळली. यात दाम्पत्य जखमी झाले. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. कुटुंबीयांनी दाम्पत्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वीज गेल्याने छतावर झोपले होते दाम्पत्य

सध्या देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पावसामुळे संध्याकाळपासून परिसरातील वीज गेली होती. यामुळे नांगल चौधरी परिसरातील वॉर्ड नंबर 13 रहिवासी विजय आणि त्यांची पत्नी प्रेम देवी हे छतावर झोपले होते. मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा वादळ आले. यावेळी विजय यांच्या शेजारच्या घराची निर्माणाधीन भिंत पती-पत्नीच्या अंगावर कोसळली.

दाम्पत्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

भिंत कोसळल्याचा आवाज आणि दाम्पत्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरचे छतावर धावत गेले. छतावर पाहतात तर पती-पत्नी भिंतीखाली कोसळलेल्या भिंतीखाली दबले होते. घरच्यांनी तात्काळ दोघांना सरकारी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत जोडप्याला दोन मुलं आहेत. मयत विजय ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मुलं खाली घरामध्ये झोपल्यामुळे बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.