AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : मालेगावात गोळीबार हवेत झाला, धावपळीत एका इसमाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला

कायदा आणि सुव्यवस्थेला नियमित गालबोट लागणाऱ्या मालेगाव (Malegaon) शहरात पुन्हा एकदा भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने शहर हादरले आहे.

Malegaon : मालेगावात गोळीबार हवेत झाला, धावपळीत एका इसमाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला
मालेगावात गोळीबार हवेत झाला, धावपळीत एका इसमाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला Image Credit source: tv9marathi
| Edited By: महेश घोलप | Updated on: Aug 05, 2022 | 7:09 AM
Share

मालेगाव – कायदा आणि सुव्यवस्थेला नियमित गालबोट लागणाऱ्या मालेगाव (Malegaon) शहरात पुन्हा एकदा भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने शहर हादरले आहे. पवारवाडी (Pawarwadi) भागातील एका कारखानदाराकडे असलेली रोकड लुटण्यासाठी संशयित दरोडेखोरांनी कारखानदारावर हल्ला केला. मात्र सुदैवाने दरोडेखोरांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. कारखानदाराशी झालेल्या झटापटीत स्थानिकांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य तिघे फरार आहेत. कारखानदार आणि दरोडेखोर यांच्या जोरदार झटापटी झाली. या झटापतीत दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला.मालेगाव शहरात वारंवार गोळीबाराच्या घटना घडत (crime story) असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पकडलेल्या आरोपींच्या गावठी कट्टा व एक जीवंत काडतून जप्त

पकडलेल्या आरोपींच्या गावठी कट्टा व एक जीवंत काडतून जप्त केले तर अन्य तिघे फरार आहेत. संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कारखानदार यांच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. यावेळी संशयितांना पकडण्यासाठी अनेकांनी धावपळ केली. यात जाकीर हुसेन जनाब अली (वय 54, रा. उत्तरप्रदेश) हे देखील मदतीला धावून गेले. मात्र या धावपळीत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मालेगाव शहरात गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. सर्रासपणे गोळीबार, तलवार बाळगणे, धारदार शस्त्राने वार करणे, गावठी कट्टे, काडतूस, मारहाण आदी घटना नित्याच्या झाल्या आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यात संबंधित प्रशासनाला अपयश येत आहे. याशिवाय किरकोळ वादातून देखील गावठी कट्टे वापरणे, तलवारीने वार करणे आदी घटना घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन