AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुगे विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली, मग वाद टोकाला गेला अन् रेल्वे स्टेशनवरच विपरीत घडलं !

फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. मग पुढे जे घडले त्याने रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली.

फुगे विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली, मग वाद टोकाला गेला अन् रेल्वे स्टेशनवरच विपरीत घडलं !
नाशिकमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
| Updated on: Jun 06, 2023 | 11:35 AM
Share

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना नाशिकच्या नाशिकरोड येथील सिन्नर फाटा भागात घडली. अजय काळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारच्या बाहेर ही घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी भुसावळकडे जाणाऱ्या चालत्या रेल्वेत बसून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नाशिकरोड गुन्हे पथकाने पाठलाग करुन आरोपीला पकडले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य नागेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित दोघेही फुगे विक्रेते आहेत.

किरकोळ कारणातून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक चारच्या बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हळूहळू या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आदित्य शिंदे आणि त्याच्या नातेवाईकांनी अजय काळे या युवकावर चाकूने वार केले. अजयला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एकावर हल्ला झाला असून, त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी गाठले

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून हल्लेखोरांची पळापळ झाली. यावेळी मुख्य आरोपी आदित्य शिंदेने ट्रेन पकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.