क्षुल्लक वाद टोकाला गेला, मग मजुरासोबत जे केले ते भयंकरच !

| Updated on: Feb 21, 2023 | 2:20 PM

हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून किरकोळ कारणावरुन वाद झाला. यात हितेश याने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली होती. यातून संतापलेल्या अलीम याने हितेश याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला.

क्षुल्लक वाद टोकाला गेला, मग मजुरासोबत जे केले ते भयंकरच !
मोबाईलवरुन झालेल्या वादातून मजुराची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : निफाड तालुक्यातील सायखेडा येथे 11 फेब्रुवारी रोजी आढळलेल्या मुंडके नसलेल्या मृतदेहाबाबत छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. मोबाईलवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून शेतमालकांनीच शेतावर मजुरी करणाऱ्या मजुराचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे, योगेश जगदीश संगमनेरे, शरद वसंत शिंदे, अलीम लतीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. हितेश असे हत्या करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.

गोदावरी नदीत आढळला होता शीर नसलेला मृतदेह

नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एक मृतदेह मुंडके छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र या घटनेचा भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

क्षुल्लक कारणातून दोन मजुरांनी केल हत्या

खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे आणि संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत आहे. या ठिकाणी त्यांनी मागील महिन्यात पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हापासून हितेश हा शरद आणि अलीम या दोन मजुरांसोबत शेतात मजुरीचे काम करत होता. मात्र 7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून किरकोळ कारणावरुन वाद झाला.

हे सुद्धा वाचा

यात हितेश याने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली होती. यातून संतापलेल्या अलीम याने हितेश याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. यात हितेश याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे, घटनास्थळी आले.

बदनामी टाळण्यासाठी शेतमालकाच्या सांगण्यावरुन मृतदेहाची विल्हेवाट लावली

आपल्या हातून बटाईतसाठी घेतलेली जमीन जाईल आणि गावात बदनामी होईल, या चिंतेने जगदीश संगमनेरे आणि संदिप संगनमेरे यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेश याचे शीर वेगळे करत, धड गोणपाटात टाकून स्विफ्ट कारने गोदावरी नदीवरील पुलावर नेले आणि नदीत टाकले.

पोलीस पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांचे पथक करत आहे.