पतीचे दुसऱ्या महिलेशी होते अनैतिक संबंध, पत्नीने प्रेयसीच्या त्याच्या नवऱ्यालाच हाताशी धरले मग…

पतीचे एका विवाहित महिलेसोबत अवैध संबंध होते. इतकेच नाही पती त्या महिलेला पळवून घेऊन आला होता. यामुळे आरोपी महिलेला खूप संताप आला होता. तर दुसरीकडे पळून आलेल्या महिलेचा पतीही सूडाच्या आगीत जळत होता.

पतीचे दुसऱ्या महिलेशी होते अनैतिक संबंध, पत्नीने प्रेयसीच्या त्याच्या नवऱ्यालाच हाताशी धरले मग...
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवले
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 25, 2023 | 9:23 PM

पालघर : पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने त्याची हत्या केल्याची घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. संतोष रामा टोकरे असे हत्या करण्यात आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीसह पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.

पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याने पत्नीचा संताप

पतीचे एका विवाहित महिलेसोबत अवैध संबंध होते. इतकेच नाही पती त्या महिलेला पळवून घेऊन आला होता. यामुळे आरोपी महिलेला खूप संताप आला होता. तर दुसरीकडे पळून आलेल्या महिलेचा पतीही सूडाच्या आगीत जळत होता.

सूडभावनेतून पद्धतशीर कट रचून हत्या

अशाप्रकारे सूडाच्या आगीत होरपळत पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या पतीशी संपर्क साधून पूर्ण नियोजन करून पतीचा खून केला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या तपासात व चौकशीत पतीची हत्या करणाऱ्या आरोपी पत्नीचे पतीच्या प्रेयसीच्या पतीसोबतही अवैध संबंध असल्याचे उघड झाले. यावरुन हत्येची दोन कारणे आता समोर आली आहेत.

एक, पतीने धोका दिल्याने बदला घेण्यासाठी पत्नीने ही हत्या केली. तर दुसरा पतीचे प्रेयसीचे पतीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी आरोपी महिलेने पतीला मार्गातून दूर केले.

हत्येच्या आठवडाभरापूर्वी दोघांनी हत्येचे पद्धतशीर नियोजन केले. यानंतर संतोष टोकरे गाढ झोपेत असताना धारदार शस्त्राने गळा आवळून आणि डोक्यात वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.