AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढं प्रेम … मन जिंकता आलं नाही, म्हणून थेट तिच्या दारातच प्राण सोडला

लग्नाला नकार दिला म्हणून प्रणय बडे याने तरुणीच्या दारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. पाली पोलिसांच्या मदतीने प्रणयला तात्काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रणय बडेला मृत घोषित केले.

एवढं प्रेम ... मन जिंकता आलं नाही, म्हणून थेट तिच्या दारातच प्राण सोडला
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 30, 2022 | 8:06 PM
Share

रायगड : सुधागड तालुक्यातील पाली येथील एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिच्याच घराच्या दारात तरुणाने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. प्रणय केशव बडे राहणार आंबेघर असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान प्रणयच्या नातेवाईकांनी घातपताचा संशय व्यक्त केली आहे. या घटनेची सखोल चौकशी (Inquiry) करावी आणि सत्य बाहेर काढून दोषींवर कठोर कारवाई (Strict Action) करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारींचे रितसर निवेदन देखील दिले आहे.

पालीतील मधली आळी येथील संकल्प बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तरुणीने पाली पोलीस स्थानकात घटनेची खबर दिली. लग्नाला नकार दिला म्हणून प्रणय बडे याने तरुणीच्या दारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

प्रणयला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या इमारतीत ही घटना घडल्याने नागरिकांनी प्रणयला वाचविण्यासाठी मदतीसाठी धाव घेतली. येथील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. त्यानंतर पाली पोलिसांच्या मदतीने प्रणयला तात्काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रणय बडेला मृत घोषित केले.

सखोल चौकशीची प्रणयच्या नातेवाईकांची मागणी

प्रणयचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व पोलीस स्थानकात गर्दी केली होती. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर हे देखील मध्यरात्री पाली पोलीस स्थानकात आले. त्यांनी पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या साहाय्याने जमावाला संयमाने हाताळले. (In Raigad young man sets himself on fire after girl refuses marriage)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?