VIRAL VIDEO |संसदेत महिला खासदारावर हात उचलला, पुरुष खासदाराचं सर्वांसमोर लाजीरवाणं कृत्य

सेनेगलमधील संसदेत बजेट सुरु होते. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार अमी नादिये गनीबी आणि विरोधी खासदार मसाता सांब यांच्यात जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की मसाता आपल्या जागेवरून उठले आणि महिला खासदाराला कानशीलात मारायला लागले.

VIRAL VIDEO |संसदेत महिला खासदारावर हात उचलला, पुरुष खासदाराचं सर्वांसमोर लाजीरवाणं कृत्य
संसदेत खासदारांमध्ये मारामारी
Image Credit source: social
| Updated on: Dec 05, 2022 | 7:25 PM

नवी दिल्ली : संसदेत नेत्यांनी एकमेकांशी भांडण करणे ही एक सामान्य बाब आहे. नेत्यांमधील वाद, भांडणे आपण नेहमीच पाहतो. मात्र आफ्रिकन देश सेनेगलमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. संसदेत एका खासदाराने सत्ताधारी महिला खासदाराच्या कानशीलात लगावल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर संतापलेल्या महिला खासदाराने मारहाण करणाऱ्या खासदारावर खुर्ची फेकली. दोन्ही नेत्यांच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

सेनेगलमधील संसदेत बजेट सुरु होते. यादरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदार बेन्नो बोक्क याकर यांनी सेनेगलच्या एका आध्यात्मिक नेत्यावर टीका केली. राष्ट्रपती मॅकी सॅल यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला विरोध केल्याने सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने अध्यात्मिक नेत्यावर टीका केली.

यावरुन सत्ताधारी पक्षाचे खासदार अमी नादिये गनीबी आणि विरोधी खासदार मसाता सांब यांच्यात जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की मसाता आपल्या जागेवरून उठले आणि महिला खासदाराला कानशीलात मारायला लागले.

कानशीलात मारल्यानंतर महिला खासदारही संतप्त झाल्या आणि त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारावर खुर्ची फेकली. संसदेत उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षाच्या खासदाराचा सत्ताधाऱ्यांकडून जोरदार निषेध

विरोधी पक्षाच्या या कृ्त्याचा सत्ताधारी पक्षाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या खासदारावर सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मीडियातील दाव्यानुसार, मारहाण करण्यात आलेली महिला खासदार गरोदर असून, मारहाणीमुळे तिच्या मुलावर परिणाम झाला आहे. तथापि याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.